मीनाक्षी नटराजन यांना काँग्रेसने त्यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवण्यासाठी निवडले, हे सर्वांना माहीतच आहे.त्यांच्याबाबतीत बहुतांश काँग्रेसच्या लोकांना माहीत नाही. त्या इतक्या कट्टर प्रामाणिक आणि गांधीवादी नेत्या आहेत की, काँग्रेसने त्यांना २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंदाजे X कोटी रुपये दिले.
(ज्यांना काँग्रेसची माहिती आहे, त्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्षात प्रतिष्ठेनुसार निवडणुकीसाठी पैसे दिले जातात.) निवडणुकीनंतर, त्यांनी उरलेली ८०% अधिक रक्कम पक्षाच्या निधीत परत जमा केले. त्याचप्रमाणे, विधानसभा निवडणुकीतही, त्यांनी निवडणुकीनंतर आपल्या पैशांपैकी अंदाजे ७५% रक्कम पक्षाच्या निधीत परत जमा केली.
आजच्या राजकारणात निवडणूक म्हणजे कोट्यवधी रुपयांचा खर्च, संसाधनांची स्पर्धा आणि वैयक्तिक फायद्याच्या चर्चा. अशा वातावरणात निवडणुकीसाठी मिळालेल्या निधीपैकी मोठी रक्कम खर्च न झाल्यामुळे ती पुन्हा पक्षाकडे परत करणारे नेते किंवा नेत्या शोधूनही सापडणार नाहीत. पण मीनाक्षी नटराजन यांनी हे केवळ एकदा नव्हे, तर सातत्याने केले आहे. त्यामुळे त्यांची ओळख केवळ एक राजकीय नेत्या म्हणून नाही, तर मूल्यांवर चालणारी प्रामाणिक कार्यकर्ती म्हणून निर्माण झाली आहे. पण एव्हड्याच करणावर त्यांना उमेदवार दिला का तर नाही.
त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीपासून ते खाण्यापिण्यापर्यंत, त्या पूर्णपणे गांधीवादी आहेत. साधेपणा, शिस्त, वैचारिक बांधिलकी आणि संघटनेप्रती निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य भाग आहेत. पद मिळवण्यासाठी धडपड करण्यापेक्षा पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हेच त्यांचे राजकारण राहिले आहे.
काँग्रेसमध्ये अनेक नेते आले,अनेक गेले, अनेकांनी पदे भूषवली. पण काही लोक संघटनेच्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात. मीनाक्षी नटराजन या अशाच नेत्यांपैकी एक आहेत. त्या प्रकाशझोतात राहण्यापेक्षा जमिनीवर काम करणाऱ्या, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणाऱ्या आणि पक्षाच्या विचारांसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या काँग्रेसच्या खऱ्या सैनिक आहेत.
राजकारणात निष्ठा, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि विचारांशी असलेली बांधिलकी यांना जर खऱ्या अर्थाने सन्मान द्यायचा असेल, तर अशा व्यक्तींना संसदेत पाठवणे आवश्यक आहे. त्यामुळेच राज्यसभेसाठी त्यांची निवड हा केवळ राजकीय निर्णय नसून मूल्याधिष्ठित राजकारणाला दिलेला सन्मान मानला जाऊ शकतो.
ज्येष्ठ,बलाढ्य आणि प्रस्थापित नेत्यांना डावलून एका सामान्य गांधीवादी कार्यकर्तीला दिलेली उमेदवारी ही केवळ राज्यसभेची निवड नाही, तर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या बदलाची स्पष्ट घोषणा आहे.
हा निर्णय दाखवून देतो की काँग्रेस आता केवळ मोठी नावे, राजकीय वजन किंवा गटबाजी यांवर चालणारा पक्ष राहिलेला नाही. संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करणारे, विचारधारेशी निष्ठावान राहणारे आणि साधेपणाने राजकारण करणारे कार्यकर्तेही सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतात, हा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
काँग्रेस पक्ष म्हणजे आपल्या घरचा माल असल्यासारखे समजणाऱ्या आणि पदांवर आपलाच जन्मसिद्ध हक्क असल्याच्या भावनेत वावरणाऱ्या पक्ष अडचणीत असतांना हात वर करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना हा निर्णय खडबडून जाग करणारा आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही.
राजकारणात पदे ही वारसा,वजन किंवा दबावामुळे नव्हे,तर कार्य,निष्ठा आणि योगदानाच्या आधारावर मिळाली पाहिजेत, हा संदेश या निर्णयातून अधोरेखित झाला आहे. त्यामुळे मीनाक्षी नटराजन यांची उमेदवारी ही केवळ एका व्यक्तीची निवड नसून काँग्रेसमधील नव्या राजकीय संस्कृतीची नांदी मानली जात आहे.


0 टिप्पण्या