अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याची फिर्याद गेल्या महिनाभरापूर्वी पोलिसांत दाखल करण्यात आली होती.मात्र तिचा ह्याच खदान पोलिसांच्या सांगण्यानुसार संपूर्ण अकोला शहर व आजुबाजूच्या दोन तीन जिल्ह्यात कसोशीने शोध घेतला तरी तिचा शोध लागू शकला नाही.
मात्र कोणताही सुगावा नसतांना संपुर्ण अकोला शहर व आजुबाजुचे जिल्हे पिंजुन खदान पोलीसांनी अखेरीस त्या अल्पवयीन मुलीला अकोल्यातीलच जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बाळापूर नाक्यावरून शोधुन काढले आणि तिच्या पालकांच्या चेह-यावर हास्य खुलविले. अगदी "काखेत कळसा आणि गावाला वळसा" ह्या म्हणीचे खदान पोलिसांनी तंतोतंत पालन केले आहे.
ह्याच खदान स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मनोज केदारे ह्यांनी वृत्तपत्रांना प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पोलीस स्टेशन खदान,अकोला येथे एका फिर्यादीने दि.०६/०५/२०२६ रोजी फिर्याद दिली होती की, त्यांची बहिणीची १४ वर्ष वय असलेली अल्पवयीन मुलगी दि.०३/०५/२०२६ रोजी सकाळी ११/०० वा. वे सुमारास धुणे-भांडी करण्याच्या कामासाठी तिचे मावशी सोबत मोहल्ल्यात गेली होती. परंतु तिची तब्येत ठिक नसल्याने ती आराम करण्या करीता घरी जाते असे सांगून घराकडे गेली, परंतु घरी पोहोचली नाही त्यामुळे तीचा मोहल्ल्यात, नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळुन न आल्याने तिचे मावशीने पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्ट वरून पो.स्टे.खदान, अकोला येथे अप.क. १०३१/२०२६ कलम १३७ (२) बी.एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास सहा.पोनि. पुरुषोत्तम ठाकरे, पो.स्टे.खदान,अकोला हे करीत होते. गुन्हयाचे गांभीर्य पाहता अकोल्याचे हरविलेल्या लोकांना शोधण्यात हातखंडा असलेले, राज्यस्तरावर ह्यासाठी पुरस्कार प्राप्त,कार्यतत्पर,कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री.माननीय अर्चित चांडक साहेब यांनी पो.नि.केदारे यांना योग्य मार्गदशन करून त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे.च्या कर्मचाऱ्यांची एकुण ०४ विशेष पथके तयार करून त्या पथकांनी संपुर्ण अकोला शहर, अकोट, बार्शीटाकळी, बोरगांवमंजु, मुर्तिजापुर, अमरावती, शेगांव, खामगांव येथे जावुन तेथील बसस्थानके, रेल्वे स्टेशन, हॉटेल, रेस्टारेन्ट, पार्क, मंदीरे, झोपडपटटया येथे जावुन तेथील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक केले. तसेच ऑटो चालक, लहान हॉटेल चालक, फुटपाथवरील विक्रेते, पाणीपुरीवाले यांना सदर हरविलेल्या मुलीची शोधपत्रिका व फोटो दाखवुन शोध घेतला. सदर हरविलेल्या मुलीकडे मोबाईल नसल्या कारणाने व तीचे बद्दल काहीही माहीती मिळत नसल्याने पोस्टेच्या विशेष पथकाने दिवस रात्र अहो मेहनत करून पो.स्टे. अकोला शहर येथील प्रत्येक चौकातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक केले तसेच बाल कल्याण व महीला समीतीचे अध्यक्ष यांना प्रत्यक्ष भेटुन प्रत्येक जिल्ह्यातील मुलींचे बाल निरिक्षण गृह यांची माहीती घेण्यात आली.
तरी सुध्दा माहीती निष्पन्न होत नसल्याने शोथ पथकाने अत्यंत शिताफीने पिडीत मुलीची गोपनिय बातमीदार यांचे कडुन माहीती प्राप्त करून अकोला येथील बाळापुर नाका येथे शोध घेवुन तिला तीचे पालकांचे समक्ष हजर केले.
सदर तपासात,
> ३० दिवसात एकुण ६८५ सि.सि.टी.व्ही. चेक केले.
> सदर तपासात एकुण २५ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार अहोरात्र मेहनत घेत होते.
> ४७ गावात व शहरात हरविलेल्या बालीकेचा शोध घेतला.
> २४६ वेगवेगळे साक्षीदार यांचेकडे विचारपुस केली.
> ३५ पेक्षा अधिक संशयीत व्यक्तीचे घराची व मालमत्तांची झडती घेण्यात आली.
सदरची कारवाई मा.श्री.अर्चीत चांडक साहेब पोलीस अधिक्षक अकोला, मा.श्री.चंद्रकांत रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक, मा.सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, अकोला स्वतः पोलीस निरिक्षक मनोज केदारे, पोलीस स्टेशन खदान अकोला यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. पुरुषोत्तम ठाकरे, स.पो.उप.नि.संजय वानखडे, पोहवा. गिरिष विर, पो.ना.संदीप काटकर, पो.अं.श्याम घायल,आकाश कठाणे,रोहीत पवार , मंगेश खेडकर, पल्लवी गायकवाड पो.स्टे.खदान यांनी केली.
अशाप्रकारची माहिती वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी खदान पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दस्तुरखुद्द मनोज केदारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अकोल्यातील एल.सी.बी.च्या रिक्त होणाऱ्या जागेवर बसण्याची स्वप्ने पाहणाऱ्या खदान पोलिस ठाण्याच्या ठाणेदार मनोज केदारे ह्यांना एका अल्पवयीन मुलीचा जवळपास एक महिना, तीन तीन जिल्ह्यात शोध घेऊनही पत्ता लागू नये,आणि अखेरीस ती एका खबऱ्याच्या सांगण्यानुसार अकोल्याच्या बाळापूर नाक्यावर खदान पोलिस ठाण्यापासून केवळ दीड ते दोन किलो मीटर अंतरावर सापडावी.ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे.गेल्या महिनाभर ही मुलगी कुठे होती.तिला कुणी फूस लावून पळवून नेले की ती स्वतः रस्ता भटकली. महिनाभर तिला कुणी खावू पिऊ घातले.? ह्यातील कोणत्याच बाबीचा त्यांनी उल्लेख ह्या प्रसिद्धीपत्रकात केलेला नाही. ह्याप्रकरणांत कुणालाही आरोपी करण्यात आलेले नाही.ह्याचा अर्थ काय.? जर का प्रशिक्षित ज्येष्ठ,श्रेष्ठ पोलिस अधिकारी, वर्षानुवर्षे पोलिस दलात सेवा बजावणारे पोलिस कर्मचारी ह्यांना शोध घेऊनही न सापडलेली मुलगी एका खबऱ्याला कुठे आहे ते माहित होते.तर त्या खबऱ्याचे नेटवर्क वापरून मोठमोठे अवैध धंदे, गुटख्याचे गोदाम ह्यावर धाडी का घालण्यात येत नाहीत.? अकोल्यातील नकली दारूचे धंदे कोण कोण करत आहे ह्याची माहिती हा खबऱ्या का नाही देत.? ते सगळे जावू द्या,निदान एका मुलीचा शोध घेण्याकामी लाखमोलाची मदत केल्याबद्दल ह्या खबऱ्याचा नाही उघडपणे करता येत, तर गुप्तपणे,चार भिंतीच्या आत तरी त्याचा सन्मान करण्यात यावा,अशीच अकोलेकरांची इच्छा आहे.
अकोला जिल्ह्यात दररोज कित्येक मुलेमुली बेपत्ता होत असतात,शेवटी त्यांचा तपास लावण्याची जबाबदारी ही स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केल्या जाते.आणि त्याच स्थानिक गुन्हे शाखेत जर का मनोज केदारे ह्यांना बसविले, आणि बेपत्ता असलेल्या लोकांना त्यांचा पत्ता काढून त्यांच्या शोधकामी जर असाच वेळ आणि पोलिसांचे श्रम,वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मार्गदर्शन करण्यासाठी वेळ खर्च झाला तर ते किती दिवस त्या शाखेत टिकतील हा महत्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे.
अशाच पद्धतीने जर खदान पोलिस ठाण्याचा कारभार चालला तर एल.सी.बी. त बसवायचे सोडा आहेत त्या ठाण्यात तरी त्यांना एस.पी.साहेब ठेवतील काय.? हा प्रश्न आज रोजी अकोल्यातील मीडियाच्या लोकांना पडला आहे.


0 टिप्पण्या