पोलिस कोठडीतील आरोपीला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने करण्यात आलेल्या चौकशीच्या अहवाला नुसार अमरावती ग्रामीणच्या चांदुर रेल्वे पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अमरावती ग्रामीणमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
न्यायालयाने काढलेल्या पकड वॉरंट मधील अटक करण्यात आलेल्या नितेश मेश्राम या आरोपीच्या पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीने मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी अहवालानंतर, चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध २ नोव्हेंबर २०२५ रोजी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये संबंधित ९ कर्मचाऱ्यांविरुद्ध अपराध क्रमांक ६११/२०२५, भारतीय दंड विधान कलम ३०२ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक अधिकारी ८ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नमूद सर्व ८ पोलीस अंमलदार यांना आज रोजी तातडीने निलंबित केले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या खालील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
१) सपोउपनि. राजकुमार मुलामचंद जैन, बं.न. ११२७
२) पोलीस हवालदार विशाल मुकुंदराव रंगारी, ब.नं. २२६९
३) म.पो.शि.अश्विनी शामरावजी आखरे, ब.नं. ९२९
४) महिला पोलीस शिपाई सरिता वैद्य, ब.नं. १२०४
५)पोलीस हवालदार प्रविण रामदास मेश्राम, ब.नं. १७७७
६) पोलीस शिपाई अलीम हकीम गवळी, ब.नं. ८४८
७) पोलीस शिपाई अमोल अमृतराव घोडे, बं.न. १६४
८) पोलीस नाईक प्रशांत ढोके, ब.नं. १७५३
न्यायालयीन चौकशी अहवालात, आरोपीच्या मृत्यूसाठी गार्ड इंचार्ज व गार्ड ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार यांना जबाबदार धरण्यात आले असून नमूद पोलीस अंमलदार यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची जनमानसात बदनामी झाली असून, कर्मचाऱ्यांनी अत्यंत बेशिस्त वर्तन, बेजबाबदार व निष्काळजीपणा दाखविला असल्याचा ठपका त्यांचेवर ठेवण्यात आला आहे. निलंबन कालावधीत या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, अमरावती ग्रामीण हे राहील.
त्याचप्रमाणे न्यायालयीन चौकशीत दोषी आढळलेले पोलीस निरीक्षक अजय अहिरकर तात्कालीन ठाणेदार पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध कारवाई करिता वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे.आरोपी पोलिस निरीक्षक अजय अहिरकर यांची अमरावती विभागातून नागपूर विभागात बदली झालेकी असून ते आजरोजी नागपूर पोलिस दलात विशेष सुरक्षा युनिटमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे.
अमरावती शहर आयुक्तालयातील फ्रेझरपुरा पोलिस स्टेशनमध्ये ह्या ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही सर्वच प्रक्रिया अत्यंत. संथ गतीने सुरू असून झिरो कायमी होऊन प्रत्यक्षात चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल होईपर्यंत संबंधित आरोपी फरार झाले असून ते अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे कळते.
पोलिस कोठडीतील ह्या मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांकडे ठेवायचा की सीआयडी द्यायचा याचा अद्यापही निर्णय घेता आला नसून लवकरच हा तपास पोलिसांकडून काढून घेऊन दुसरीकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे कळते.

0 टिप्पण्या