राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कितीही सप्ताह साजरे करीत जनजागृती मेळावे आयोजित केले तरीही लाचखोरीची प्रकरणे काही कमी होण्याचे नाव घ्यायला तयारच नाहीत.
नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दक्षता सप्ताहाचे आयोजन करून जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते,मात्र ह्या मेळाव्यांनी भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढलाच असल्याचे गेल्या आठवड्यात एसीबीने केलेल्या रेकॉर्डब्रेक कारवायांवरून दिसून येते.
आधी तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये दिसणारी लाचखोरीची लागण आता क्लास १ च्या अधिकाऱ्यांना देखील झाली असून गेल्या काही दिवसांत राज्यातील कितीतरी वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या कारवायांमध्ये अडकल्याचे दिसले आहे.
अमरावती विभागसुद्धा लाचखोरीच्या बाबतीत इतर जिल्ह्यांपेक्षा मागे नसून या जिल्ह्याने आपला चौथा,पाचवा क्रमांक याहीवर्षी कायम ठेवला आहे.
आज अमरावती शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेच्या कार्यकारी अभियंत्याला लाच मागणीच्या प्रकरणांत अटक करून पोलिस कोठडीची हवा दाखविल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
रोहण चंद्रशेखर पाटिल, वय ३५ वर्षे, कार्यकारी अभियंता, वर्ग १. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, विभागीय कार्यालय अमरावती ह.मु. साईनगर अमरावती,मूळ राह.कल्पतरु नगर, अशोका मार्ग, नाशिक ता.जि.नाशिक असे ह्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्यावर गाडगेनगर पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाची हकीकत अशी की, यातील तकारदार शासकीय कंत्राटदार असून कार्यकारी अभियंता सा.बांध.विदयुत विभाग अमरावती यांच्या कार्यालयाकडून बुलढाणा जिल्हयातील इलेक्ट्रीकल्सची कामे मिळाली होती. सदर कामाचे अंदाजपत्रक कमांक ९८५, १३०४, १५८ असे असून त्याबाबत रोहन पाटील कार्यकारी अभियंता, सा.बांध. विद्युत विभाग अमरावती यांना भेटण्याकरीता गेले असता, त्यांनी तक्रारदार यांना सांगीतले की, सदर तिन्ही काम हे एकूण १७,९४,००० रुपयाचे होतात तर "तुम्ही मला २ टक्के प्रमाणे ३५,००० रुपये दया, तसेच तुम्ही बुलढाणा येथील जूने शासकीय विश्रामगृहाचे नुतणीकरण या कामाचे अंदाजपत्रक कमांक ९८६ ची वर्क ऑर्डर सुध्दा घेवून जा". रोहन पाटील, कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदार यांचे मागील झालेले तिन कामाच्या १७,९४,००० या देयकाच्या रक्कमेच्या ०२ टक्के ३५,००० रुपये लाचेची मागणी करीत आहे. अशी लाच मागणी बाबत तक्रार दिली होती.
सदरहू तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०४.०९.२०२५ रोजी आयोजित पडताळणी कार्यवाही दरम्यान लाचखोर कार्यकारी अभियंता रोहन चंद्रशेखर पाटिल यांनी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, विभागीय कार्यालय अमरावती यांनी येथे तक्रारदार यांना तिन कामाचे २ टक्के प्रमाणे ३५,००० रुपये व वर्क ऑर्डरचे ६,००० रुपये असे एकूण तडजोडीअंती पंचासमक्ष ४१,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान सुद्धा झाल्याने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती.मात्र दोन वेळा प्रयत्न करूनही लाचेची रक्कम न स्वीकारल्याने आज दिनांक ०३/११/२०२५ रोजी लाचखोर कार्यकारी अभियंता रोहण पाटिल यांस अटक करून ताब्यात घेण्यात आले असुन त्याच्या विरुदध पो.स्टे. गाडगेनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरहू कार्यवाही सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुनिल किनगे, पोलीस उपअधिक्षक मंगेश मोहोड पोलीस अमंलदार युवराज राठोड, वैभव जायले, चालक गोवर्धन नाईक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

0 टिप्पण्या