अकोल्यातील "गोवंश हत्ये"च्या फरार आरोपींना धारणी पोलिस ठाण्यात "मनुष्य हत्ये"च्या गुन्ह्यात अटक...

   मुक्या "प्राण्यांची कत्तल" करता करता "जित्या जागत्या" माणसांचीही निर्दयपणे हत्या करणाऱ्या हिवरखेड येथील सराईत आरोपींवर अजूनही अकोला जिल्ह्यातील हिवरखेडचे पोलिस मोका किंवा एमपीडीए सारखे गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात का करीत नाहीत.? हा जिल्ह्यातील शांतताप्रिय व गोवंश प्रेमी जनतेचा जिल्हा पोलिस अधीक्षकांना सवाल आहे.


   राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात गोवंश हत्येच्या प्रकरणातील आरोपींना कोणतीही दयामाया न दाखविता त्यांच्यावर "मोका" सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सभागृहाला आश्वासन दिलेले असतानाही त्यांच्याच अखत्यारीत असलेल्या पोलिसांना ह्या गोष्टीचा विसर पडला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.


   ज्यांच्यावर गेल्या काही वर्षांत हिवरखेड पोलिस ठाण्यात "गोवंश हत्ये"सह एक दोन नव्हे तर तब्बल प्रत्येकी सहा गुन्हे दाखल असतानाही अकोला पोलिस कुणाच्या आणि कशाच्या "दबावा"खाली येवून ह्या "समाज विघातक" व्यक्तींवर "स्थानबद्ध"तेची कारवाई, का करीत नाहीत हा एक "संशोधनाचा विषय" आहे.

   हिवरखेड येथील गोवंश कत्तल प्रकरणातील फरार असलेले आरोपी आवेश खान व शेख शाहरुख यांनी अकोट सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज आज त्यांच्या वकिलांनी मागे घेतला असून ह्या दोन्ही आरोपींना धारणी पोलीसांनी खुनाच्या गुन्हयात केली अटक केलेली आहे.

   हिवरखेड पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अप. क्र. २५७/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण अधि. कलम ५बी, ५ सी,आणि ९अ सहकलम ११ प्राणि छळ प्रतिबंधक  अधिनियम मधील आरोपी आवेश खान अयाज खान सत्तार, वय २५ वर्ष राहणार रा आठवडी बाजार हिवरखेड ता. तेल्हारा, जि अकोला शेख शाहरुख शेख रोशन वय २९ वर्ष रा. इंदिरा नगर हिवरखेड ता. तेल्हारा जि. अकोला या आरोपींचा गोवंश कत्तल प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांच्या न्यायालयात उपरोक्त दोन्ही आरोपींनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज मंगळवार दि. ०४.११.२०२५ रोजी या दोन्ही आरोपी तर्फे मागे घेण्यात आला आहे.

   वरील दोन्ही आरोपींना गोवंश कत्तल प्रकरणात फरार असतांना पोलीस स्टेशन धारणी जि. अमरावती येथे अप क्रमांक ६६१/२५ मध्ये धारणी पोलीसांनी खुनासारख्या गंभीर गुन्हयामधे अटक केली आहे.

    या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद सादर केला की, या प्रकरणात फिर्यादी पोलीस हे.कॉ. दिपक ढोले पो.स्टे. हिवरखेड यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दि. १७.०९.२०२५ रोजी ते हिवरखेड पो.स्टे ला हजर असतांना माहिती मिळाली की, दोन इसम हे बगाडयाच्या नाल्याने हिवरखेडकडे गोवंश (बैल) यांना उपाशीपोटी निर्दयतेन, कुरतेने, आरुने टोचत कत्तलीसाठी घेवुन जात आहेत, त्यावरुन पोलीस स्टाफसह घटनास्थळ गाठून सापळा रचला असता त्यांना वरील दोन्ही आरोपी तीन गोवंश बैलांना कत्तीलीकरीता घेवुन जातांना दिसले. दोन्ही आरोपींना पंचासमक्ष ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे १). आवेश खान इजाज खान २). शेख शाहरुख शेख रोशन असे सांगितले तसेच आरोपींचे ताब्यातील पंचासमक्ष तीन (बैल) अंदाजे ७५ हजार किंमतीचे घटनास्थळावरच जप्त करण्यात आले. परंतु कारवाई दरम्यान अंधाराचा फायदा घेवुन वरील दोन्ही आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले पोलीसांनी आरोपींचा पाठलाग केला असता आरोपी हे मिळून आले नाही व ते फरार झाले.

   आरोपींचा या गोवंश कत्तलीच्या  गुन्हयात सहभाग असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी गोवंश कोठून आणले आहे व कत्तलीकरीता कोठे घेवून जात आहे व अजुन इतर आरोपींचा यामधे सहभाग आहे का.? याकरीता गुन्हयाचा घटनाक्रम जाणून घेण्याकरीता वरील दोन्ही आरोपीची पोलीस कस्टडीमध्ये सखोल विचारपुरस करणे आवश्यक आहे. या दोन्ही आरोपीं विरुध्द हिवरखेड पोलीस स्टेशनला यापुर्वी एकुण ६ अपराधाची नोंद आहे. ज्यामधे गोवंश कत्तलीचा गुन्हा या आरोपींवर यापुर्वी सुद्धा दाखल झालेला आहे.

   या सामाजिकदृष्ट्या अत्यंत गंभीर आलेल्या प्रकरणातील वरील दोन्ही आरोपी नेहमी सराईतपणे गोवंश कत्तलीचे गुन्हे करत असल्याचे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात सादर केलेल्या अहवालावरून अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. तरीसुद्धा यापूर्वीच पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींवर मोका किंवा एमपीडीए सारखे गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध का केले नाही.? गोवंश हत्येच्या गुन्ह्यातील हे आरोपी आता तर इतके सोकावले आहेत की, आता ते जिवंत माणसांची देखील "खुलेआम कत्तल" करयला लागले आहेत. याच दोन्ही आरोपीविरुध्द अमरावती जिल्हयात धारणी पो.स्टे.ला नुकताच खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल झालेला असून वरील दोन्ही आरोपी या खुनाच्या गुन्हयामधे धारणी पोलीसांच्या ताब्यात आहेत.

  आरोपींना कायदयाचा वचक राहिला नाही. त्यामुळे सतत गोवंश कत्तलीचे गुन्हयातील आरोपी असणा-या व नुकतेच गोवंशाची कत्तल करीत असतांनाच आता तेच आरोपी जित्याजागत्या माणसांची सुध्दा कत्तल केल्याच्या प्रकरणातील आरोपी असणा-या या दोन्हीही गुन्हेगारांवर "मकोका" अंतर्गत कारवाई होणे अपेक्षीत आहे.

    हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हददीत गोवंश कत्तलीचे आरोपी असणा-या या दोन्ही आरोपींना हिवरखेड पोलीस या गोवंश कत्तलीच्या गुन्हयात धारणी पोलीसांकडून प्रॉडक्षण वॉरंट वर कधी ताब्यात घेतात.? याकडे अकोट तालुक्यातील गोवंशप्रेमी सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे. असा युक्तीवाद पक्षा तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी या प्रकरणात न्यायालयात केला असता ह्या प्रकरणातील आरोपींतर्फे दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन अर्ज आरोपींच्या वकीलांनी मागे घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या