सातारा जिल्ह्यातील फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने ह्याला पोलीस खात्यातुन बडतर्फ करण्यात आले आहे. हे आदेश आजच बुधवार दिनांक ५/११/२०२५ रोजी जारी करण्यात आले आहेत.
फलटण शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३४५/२०२५ या गुन्हयातील अटक असलेला आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने, पोलीस उपनिरीक्षक (निलंबीत) याने पोलीस दलाचे पुर्ण ज्ञान असताना, बेफिकिरीने, नैतिक अधःपतन व दुर्वर्तन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग, यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणुक केली आहे. पोलीस उप निरीक्षक पदास अशोभनिय ठरेल असे कृत्य करुन कर्तव्य पालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. तसेच नमुद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे सार्वजनिक व लोकहिताचे दृष्टीकोनातुन उचित होणार नाही. म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने,फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, सातारा यास सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११ (२) (ब) अन्वये दिनांक ०४/११/२०२५ रोजीपासून "शासकिय सेवेतून बडतर्फ" केले आहे.
गोपाळ बदाणे हा सातारा जिल्ह्यातील फलटण पोलिस ठाण्यातील मधील एक पोलीस उपनिरीक्षक (PSI) आहे, ज्याला एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे होती त्यानंतर न्यायालयीन कोठडीत तो कारागृहात आहे. त्याने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते.
त्याच्यावर एका महिला डॉक्टरचा मानसिक छळ केल्याचा आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर त्या डॉक्टरने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये बदणे यांच्यावर बलात्कार आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२६ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपी पोलिस उपनिरीक्षकाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो कारागृहात अटकेत आहे.
पोलिस विभागाने त्याच्यावर या आधीच निलंबनाची कारवाई केली होती तर आता त्याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या