नांदुऱ्याच्या पुरवठा अधिकारी "पुनम" थोरातला एसीबीने लावले लाचखोरीचे "ग्रहण"...


    महिलांना सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार व आरक्षण देण्यात आले असल्याने आता राज्यातील शासकीय, राजकीय व सार्वजनिक जीवनात कुठेच कमी अथवा मागे नसून त्या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कामे करीत आहेत.

   "लाचखोरी वा भ्रष्टाचार" हे पूर्वी फक्त पुरुषांच्या मक्तेदारीचे क्षेत्र होते.मात्र गेल्या काही वर्षांपासून याही क्षेत्रात महिलांनी पुरुषांची बरोबरी साधली असून त्या आता तर त्या पुरुषांच्याही पुढे निघून गेल्या आहेत. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

   याच भ्रष्टाचाराच्या साखळीत आपली साखळी जोडणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तहसील कार्यालयात पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत पूनम थोरात नामक महिलेला लाचखोरीच्या गुन्ह्यात बुलढाणा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून तिला "लाचखोरीचे ग्रहण" लावल्याची घटना आज नुकतीच घडली आहे.

   नांदुरा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी
पुनम श्रीकृष्ण थोरात, वय ३४ वर्ष, पद पुरवठा निरीक्षण अधिकारी, वर्ग-२. तहसिल कार्यालय, नांदुरा रा.माऊली नगर, पाचपोर यांचे घरी भाड्याने, नांदुरा ता.नांदुरा जि. बुलढाणा.
ही महिला अधिकारी लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

  यातील तकारदार यांचे चुलते यांच्या नावावर स्वस्त धान्य दुकान असून ते स्वस्त धान्य दुकान तकारदार हेच चालवितात. सदर स्वस्त धान्य दुकानाची दि.२९.१०.२०२५ रोजी तपासणी पुरवठा अधिकारी नांदुरा यांनी केली होती. नमुद तपासणी अहवालात काही त्रूटी न दाखविता सदरचा अहवाल तकारदार यांचे बाजूने जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा यांचेकडे पाठविण्यासाठी तसेच स्वस्त धान्य दुकानात धान्य पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी  पुनम थोरात पद-पुरवठा निरीक्षण अधिकारी, नांदुरा ही लाचखोर महिला अधिकारी १६,००० रुपये रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तकार बुलडाणा एसीबीकडे प्राप्त झाली होती.

   त्यानुसार आज दि.१४.११.२०२५ रोजी प्राप्त तकारीनुसार आयोजीत पडताळणी कार्यवाही दरम्यान पुनम थोरात पद-पुरवठा निरीक्षण अधिकारी,नांदुरा ह्या तक्रारदार यांचेकडे तक्रारदार हे चालवित असलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणी अहवालात काही त्रूटी न दाखविता तक्रारदार यांचे बाजुने त्यांचे वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठविण्यासाठी व त्यांचे दुकानाचा स्वस्त धान्य पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी १६,००० रूपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम आजच घेवुन येण्यास सांगीतले. त्यानुसार आजरोजी तहसिल कार्यालय, नांदुरा येथे आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान नांदुरा तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचे दालनात तकारदार यांचेकडून १६,००० रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाचखोर पुरवठा निरीक्षण अधिकारी पुनम थोरातला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. 

   नांदुरा तहसील येथील पुरवठा अधिकारी पूनम थोरात या महिलेवर नांदुरा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

       सदरहू कारवाई बुलढाणा एसीबीचे उप अधीक्षक चोरमले यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या