गेल्या काही वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील अकोट विभागात कार्यरत असलेल्या वनपाल सुनील राऊत नामक कर्मचाऱ्यावर "भ्रष्टाचारा"चे आरोप करून कठोर कारवाईची करीत त्याची ह्या ठिकाणावरून त्वरित बदली करण्याची मागणी अकोट शहरातील शेख नासिर शेख अय्युब यांनी मागील आठवड्यात राज्याचे वनमंत्री व उपवनसंरक्षक, प्रादेशिक वन विभाग,अकोला यांच्याकडे केली आहे.
वनपाल सुनील राऊतवर योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यासाठी दिलेल्या तक्रारीत शेख नासिर यांनी म्हटले आहे की, गुरुवार दि.६/११/२०२५ रोजी संध्याकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान अकोट येथील अकोला वनविभागातील कर्मचारी वनपाल सुनील राऊत व अन्य एक यांनी अवैध लाकूड चिरान मालाची वाहतूक करून अंजनगाव वरून अकोट येथे येणारा ट्रक क्रमांक एम.एच.४३ इ ६०६३ हे वाहन अकोट शहराच्या हद्दीत थांबवून सदर वाहन वन विभागाच्या कार्यालयात न नेता परस्पर पोपटखेड रस्त्यावरील परवेज सॉ मिल, नेहरू टिंबर मार्केट,अकोट येथे नेऊन उभे केले. त्यानंतर सदर वाहनधारकांकडून अर्थपूर्ण व्यवहार करून आंबा,महारुख व इतर आडजात लाकडाचे चिरान माल असलेले हे वाहन परवेज आरामशीन मध्ये उभे करून रात्रीतून त्या वाहनातील आंब्याचा कट साइज लाकूड माल अंदाजे ६० ते ७० घनफूट रात्री तीन वाजताच्या दरम्यान काढून परवेज सॉ मिल मध्ये रफादफा केला.
सदर प्रकरणात परवेज सॉ मिलचे मालक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता सदर वाहनामधील उर्वरित आड जात चिरान लाकडा सह अकोला वन विभागाच्या कार्यालयात नेला व वाहनधारकावर कारवाई होऊ नये म्हणून आंब्याच्या लाकडाची जप्ती न दाखविता थातूरमातूर कारवाई करीत वाहन मालकाला वाचविण्याचे उद्देशाने सुनील राऊतने अर्थपूर्ण व्यवहार करून ही वाहन सोडून देत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली आहे. यात वनविभागाच्या नियमानुसार कारवाई न करता वनपाल सुनील राऊतने कोणतीही परवानगी न घेता उभ्या झाडांची कत्तल करून त्याची कोणतीही रहदारी पास न घेता वाहतूक करणाऱ्या वन तस्करांना वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यामुळे अशा शासनाचे नियम धाब्यावर बसवून वन तस्करांना साथ देणाऱ्या वनपाल सुनील राऊतवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका तक्रारीद्वारे राज्याचे वनमंत्री, उपवन संरक्षक व रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांच्याकडे केली आहे.

0 टिप्पण्या