डॉ.संतोष येवलीकर बाळापूरचे नवे एस.डी. ओ....


    अकोला जिल्ह्यातील बाळापूर महसूल विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून डॉ.संतोष येवलीकर यांची नियुक्ती राज्य शासनाने केली असून ते येत्या एक दोन दिवसांत आपला पदभार स्वीकारणार आहेत.

   डॉ.संतोष येवलीकर यांची बहुतेक कारकिर्द अकोला जिल्ह्यातच गेली असून काही वर्षांपूर्वी अकोट तहसीलमध्ये नायब तहसीलदार पदावर काम करीत असतानाच त्यांना तहसीलदार पदावर पदोन्नती मिळाल्यावर तेल्हारा तहसीलदार म्हणून त्यांनी आपला कालावधी पूर्ण केला आहे.एक उत्कृष्ट आणि समाजाभिमुख कामे करणारा अधिकारी असा त्यांचा नावलौकिक आहे.

    गेल्या आठवड्यातच राज्याच्या महसूल विभागातील ११२ तहसीलदार यांना  उपविभागीय अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यातच डॉ.संतोष येवलीकर यांचाही समावेश असून पदोन्नतीनंतर त्यांना अकोला जिल्ह्यातील बाळापूर उपविभागात (एस.डी.ओ.) उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

    त्यांच्या ह्या नियुक्तीमुळे केवळ बाळापूरच नव्हे तर अकोला जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मनमिळावू आणि सकारात्मक रित्या काम करण्याच्या पद्धतीने ते अल्पावधीतच सर्वसामान्य लोकांची अडलेली अथवा नियमित कामे मार्गी लावून आपला एक लोकप्रिय अधिकारी म्हणून नावलौकिक कायम ठेवतील अशी आशा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या