अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले मारुती जगताप यांची बदली झाल्याने नवे पोलिस अधीक्षक म्हणून बापू विठ्ठल बांगर हे येत असून ते उद्याच आपल्या पदाचा प्रभार स्वीकारणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून अमरावती एसीबीचे पोलिस अधीक्षक म्हणून आपल्या यशस्वी कारकिर्दीची नोंद करून मारुती नारायण जगताप यांची पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे पोलिस उपायूक्त या पदावर नुकतीच बदली झाली असून त्यांच्या रिक्त होत असलेल्या पदावर पिंपरी चिंचवड येथूनच बापू विठ्ठल बांगर यांच्या नियुक्तीचे आदेश दिनांक ३१/१०/२०२५ लाच जारी करण्यात आले आहेत.
अमरावती एसीबीचे नवे एस.पी.उद्या सोमवार दिनांक ०३/११/२०२५ ला आपल्या पदाचा प्रभार स्वीकारणार आहेत.बापू बांगर हे राज्य पोलिस सेवेतील नव्या दमाचे,तरुण अधिकारी असून त्यांच्या कार्यकाळात विभागातील पाचही जिल्ह्यातील वाढत्या भ्रष्टाचाराला नक्कीच आळा घातल्या जाईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

0 टिप्पण्या