गरीब मुलीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी पोलीस उपनिरीक्षक आकाश वाघेलांचा पुढाकार...


अहमदाबादमधील पोलीस उपनिरीक्षक आकाश वाघेला यांनी दाखवलेली माणुसकी आजच्या काळात खरोखरच प्रेरणादायी आहे. अभिनेते आणि सेलिब्रिटी छोट्या-मोठ्या दानासाठी लगेच चर्चेत येतात, पण खऱ्या अर्थाने मानवतेचा आदर्श घडवणारे आणि शांतपणे काम करणारे खरे हिरो मात्र दुर्लक्षितच राहतात.
 
गरीब फुलविक्रेत्याच्या मुलीला दिला जीवनाचा नवा श्वास...

   अहमदाबाद शहरातील स्थानिक फुलविक्रेता मुकेश कुशवाहा यांच्या ७ वर्षांच्या मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. त्या हातावर पोट भरणाऱ्या गरीब कुटुंबाकडे उपचारासाठी इतके पैसे नव्हते.मात्र त्यावेळी अहमदाबाद शहर पोलिस दलातील तरुण पोलिस उपनिरीक्षक आकाश वाघेला हे पुढे आले.

   स्वतःच्या वैयक्तिक बचतीतून त्यांनी ह्या मुलीच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा आणि औषधपाण्याचा खर्च उचलला.शस्त्रक्रिया सुरु असताना आणि उपचाराच्या काळात ते दररोज त्या कुटुंबाला भेट देत होते. करुणा आणि माणुसकीचे दर्शन त्यांनी कोणतेही नातेसंबंध अथवा ओळखपाळख नसताना दाखवून दिले. 

   आज ती चिमुरडी पूर्णपणे बरी झाली असून हसतखेळत घरी परतली आहे. खरी सहृदयता चर्चेत येत नाही, पण मानवतेचा प्रकाश कायम राहतो.हेच ह्या घटनेच्या निमित्ताने दिसून आले आहे. ह्या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. 

    जेव्हा अनेकजण फक्त स्वतःचा फायदा पाहतात, तेव्हा असे निस्वार्थ काम करणारे प्रामाणिक पोलीस अधिकारी समाजाचा विश्वास अधिक बळकट करतात. हेच यावरून स्पष्ट झाले आहे.

   नाहीतर आज सगळे लुटायलाच बसलेले आहेत, म्हणून असे आकाश वाघेलासारखे लोक "देवदूतासारखे नव्हे तर देवच" वाटतात.!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या