बापू बांगर यांनी कालच अमरावती एसीबीला पोलिस अधीक्षक म्हणून प्रभार घेतल्या बरोबर कारवायांचा धडाका सुरू केला असून त्यांनी पहिल्याच दिवशी वनविभागाला टार्गेट करीत परतवाड्यातील वनपालाला कचाट्यात पकडले आहे.त्यामुळे येत्या काळात लाचखोरांच्या "बेमोसम वराती" निघणार असल्याचेच हे संकेत आहेत.
अभय भिमसेन चंदेल,वय ५० वर्ष, पद वनपाल, कांडली, परतवाडा जि.अमरावती असे ह्या लाचखोर वनपालाचे नाव असून त्याने तक्रारदार शेतकऱ्याला सागवानी लाकडावर हॅमर मारून रहदारी पास देण्यासाठी ६,००० रुपयांची लाच मागणी केली होती.सबब त्याच्याविरुद्ध लाच मागणी सिद्ध झाल्याने लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वनविभागात एकाच खळबळ उडाली असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.तर लाचखोर वनपाल अभय चंदेल मात्र फरार झाला असून एसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर असून लवकरच तो ताब्यात येणार आहे.
ह्यातील तक्रारदार यांनी दि.३१/०७/२०२५ रोजी अमरावती एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली की, त्यांची मौजे म्हसोना ता. अचलपुर जि.अमरावती येथे त्यांची आठ एकर शेती असून त्यांचे शैतान २० वर्षांपूर्वी अंदाजे १२५ सागवान झाडे लावली होती. न्यापैकी ५० झाडे कापण्यासाठी त्यांनी दि.२४/०२/२०२५ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक विभाग परतवाडा येथे त्यांचे मुलाचे नावाने अर्ज केला होता. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक परतवाडा यांनी जाहिरनामा प्रसिद्ध करून कायदेशिर कार्यवाही पूर्ण करीत त्यांना परवानगी दिली होती.
मात्र सदरहू प्रकरणात प्रादेशिक वनविभाग, परतवाडा येथील वनपाल अभय भिमसेन चंदेल याने तक्रारदार यांना हॅमर करून रहदारी पास देण्यासाठी ११,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.
अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ह्या तक्रारीची सत्यता पडताळणी
दि.०१/०८/२०२५ रोजी आयोजीत केली असता ह्या पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष लाचखोर अभय भिमसेन चंदेल याने तडजोडीअंती ६,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर लगेच सापळा कारवाई करण्यात आली असता अभय भिमसेन चंदेल याला तक्रारदार यांचेवर संशय आल्याने त्याने लाच रक्कम घेण्यास टाळाटाळ करीत लाच रक्कम स्विकारली नाही. म्हणून सापळ्यात पकडण्यासाठी उगाच त्याच्यामागे न लागता लाच मागणीची बाब स्पष्ट झाल्याने लाचखोर वनपाल अभय चंदेल याच्या विरुध्द काल दिनांक ०७/११/२०२५ ला परतवाडा पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोर अभय चंदेल मात्र फरार झाला आहे.
सदरची कारवाई बापू बांगर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनात सापळा अधिकारी पो.नि.निलीमा सातव, पोलीस अंमलदार उपेंद्र श्रीगन, वैभव जायले,आशिष जांभळे व चालक गोवर्धन नाईक यांनी पार पाडली.
नागरीकांनी कुठेही लाच मागणी करून त्यांच्या कामाची अडवणूक होत असेल तर भ्रष्टाचारासंबंधी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन बापू बांगर,पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र यांनी केले आहे.

0 टिप्पण्या