पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा राज्यातील जनतेपासून आता काही लपून राहिलेली नाही,तर अत्यंत "दिलफेक व रंगीन मिजाज" अशी अजितदादांची जनमानसांत एकंदरीतच प्रतिमा बनलेली आहे,आणि ती दिवसेंदिवस आणखीच गडद होत आहे.
त्यांचा पक्ष आणि पक्षातील कार्यकर्ते मंडळी देखील त्यांचाच कित्ता गिरवत असून चूलत्यापासून वेगळे झालेल्या त्यांच्या पक्षाची देखील अशीच प्रतिमा जनमानसात रुजविल्या जात असल्याने युवावर्गाची प्रथम पसंती ही त्यांच्याच पक्षाला दिल्या जात आहे.
नुकतेच त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नागपूर कार्यालयात दिवाळी स्नेह मिलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांत महिला आघाडीच्या पदाधिकारी असलेल्या एका महिलेने अतिशय सुंदर अशी लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली आहेत.मात्र त्या लावणीने एकाच झटक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने सर्वत्र प्रसिद्धी मिळविली असून नेत्यांची मानसिकता उघड झाली आहे.
महिला पदाधिकाऱ्याने ठुमक्यात सादर केलेली लावणी "आता वाजले की बारा,जावू द्या ना घरी." ही रातोरात संपूर्ण राज्यात सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याचे वेगवेगळे प्रतिसाद उमटत आहेत.
कोटी रुपये खर्च करून अजित पवार यांनी नागपूर शहरांत सामान्य कार्यकर्ता व नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी हे कार्यालय तयार करण्यात आले आहे.मात्र सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडविण्यापेक्षा येथील कार्यकर्त्यांनी आपल्याच आनंदासाठी "गाण्यांच्या मैफीली" सजविण्याचे काम सुरू केल्याने आधीच अडचणीत असलेल्या अजित पवारांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात सादर करण्यात आलेल्या "जावू द्या ना घरी, आता वाजले की बारा" ह्या लावणीने भाजपाच्या बालेकिल्ल्यात आपले स्थान निर्माण करण्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर चौफेर टीका होत असल्याने लवकरच होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात असतानाच पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वाला जनसामान्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
महिला पदाधिकाऱ्याने सादर केलेल्या ह्या लावणीने उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्या राष्ट्रवादीचे लवकरच "बारा वाजणार" असल्याचे बोलल्या जात आहे.तसेही पक्षाच्या दुसऱ्या फळीतील महिला पदाधिकारी यांच्यामुळे सतत अजित पवार यांच्यावर "टीका टिप्पणी" होत असते,त्यात नागपूरच्या ह्या प्रकारची आणखी भर पडली,इतकेच काय ते.
.

0 टिप्पण्या