महाराष्ट्रातील नगरविकास खाते अर्थात नगर पालिका व महानगर पालिका मध्ये चालत असलेला भ्रष्टाचार गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आला असून, एकाच महिन्यात उपायुक्त व आयुक्त दर्जाच्या सुपर क्लास वन अधिकाऱ्यांना थोडीथोडकी नव्हे तर लाखो रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून गजाआड केले आहे.
गेल्याच आठवड्यात ठाणे महानगर पालिकेतील उपायुक्त पाटोळे ह्याला तब्बल ३५ लाख रुपयांची लाच घेत असताना पकडले होते.त्या लाचखोर उपायुक्ताला जामीन मिळण्यापूर्वीच आज आणखी एक आयुक्त एसीबीच्या तावडीत सापडला आहे.
जालना शहर महानगरपालिकेत आयुक्त ह्या पदावर असलेल्या संतोष खांडेकरला दहा लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. जालना महानगर पालिकेच्या बांधकाम विभागातील बांधकामाची कामे करणाऱ्या कंत्राटदाराकडून त्याचे देयक अदा करण्यासाठी आयुक्त संतोष खांडेकरने चक्क दहा लाखांची लाच मागितली.परंतु संबंधित कंत्राटदाराला ती द्यावयाची नसल्याने त्याने जालना एसीबीला लेखी तक्रार दिली.ह्या लाच मागणीच्या तक्रारीची सत्यता पडताळणी केली असता खरी असल्याचे आढळून आल्याने प्रत्यक्षात सापळा रचला असता त्यात लाचेची रक्कम स्वीकार्ट असताना जालना महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकर एसीबीच्या हातात रंग सापडला असता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
एसीबीकडून आयुक्त संतोष खांडेकरच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेणे सुरू असून गेल्या चार ते पाच तासांपासून ती सुरूच आहे.ह्या झडतीत नेमके काय काय सापडले ह्याचा खुलासा अद्यापतरी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेला नाही.
जालना शहरात आज संध्याकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतः महापालिकेचा आयुक्तच त्याच्या जालना शहरातील मोतीबाग परिसरातील शासकीय लाच घेताना पकडला गेल्याने जिल्ह्यातील प्रशासन हादरले असून राज्याच्या नगर विकास विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जालना महापालिका गेल्या काही दिवसांपासून सतत वादात असून महानगर पालिकेतील बांधकाम विभागात चाललेल्या भ्रष्टाचाराला सर्वसामान्य जनता पुरती कंटाळली आहे.प्रत्यक्ष आयुक्तांचे लाचखोरी केली असल्याने ह्या भ्रष्टाचाराच्या साखळीत आणखी कुणाकुणाची नावे पुढे येतात हे येणारा काळच सांगू शकेल.
अपडेट :
लाचखोराचे नाव : संतोष महादेव खांडेकर वय-४८ वर्षे, महानगर पालिका आयुक्त, जालना. २०,००००० रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १०,००००० रुपये स्विकारले असता रंगेहात पकडले.
गुन्हा घ.ता.वेळ व ठिकाण :
दिनांक १६.१०.२०२५ रोजी १९.३५ वाजेच्या सुमारास, महानगर पालिका आयुक्त यांचे कुंडलिका या निवासस्थानी, मोतीबागेजवळ जालना.
लाचेची रक्कम : १०,००००० रुपये
यातील तक्रारदार हे कंत्राटदार असुन तक्रारदार यांचे जालना महानगर पालिका अंतर्गत जालना शहरात ०१). वाल्मिक नगर (गांधीनगर) पुल ते रिंग रोड पर्यंत सीसी रोड व डीपी रोड बांधकाम ०२). भक्कड फॉर्म ते भवानी नगर रस्त्याचे सीसी रोड व भुमीगत गटारे बांधकाम ०३). जालना महानगर पालिका येथिल तिस-या मजल्याचे बांधकाम ०४). एपीएमसी रिंग रोड ते हिंदनगर पर्यंत २४ मीटर रुंद डीपी रोड चे सिमेंट कॉक्रिटकरण करणे या कामाचे वर्क ऑर्डर देणे व कामांचे देयक मंजुर करण्यासाठी जालना महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर याने तक्रारदार यांच्याकडुन ४०,००००० रुपये घेतलेले आहेत. वाल्मिक नगर (गांधीनगर) पुल ते रिंग रोड पर्यंत सीसी रोड व डीपी रोड बांधकामाची तांत्रिक मान्यता मिळालेली असुन त्याची निविदा रक्कम ही २,९०,८९,५३५ रुपये जीएसटी वगळता इतकी आहे. सदर कामाचा कार्यारंभ आदेश हा काढण्यात आलेला असुन सदरचे काम हे दिलेल्या मुदतीत पुर्ण करुन कामाचे धावते देयक २,८२,००,००० रुपये मंजुरीसाठी सादर केले असता सदर देयकामधुन १,९२,००,००० रुपये मिळालेले असुन उर्वरीत ९०,००,००० रुपये मिळणे बाकी आहे. उर्वरीत ९०,००००० रुपये व उर्वरीत कामांचे रेकॉर्ड होणारे १,६०,००,००० रुपये देयक काढण्यासाठी २०,००,००० रुपये घेउन लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर याने तक्रारदार यांना दि.१६.१०.२०२५ रोजी त्यांच्या शासकिय निवासस्थानी या असे सांगितले, परंतू तक्रारदार यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक १५/१०/२०२५ रोजी एसीबी कार्यालय जालना येथे समक्ष हजर राहून लेखी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीवरुन दि.१६.१०.२०२५ रोजी १९.३५ वा. च्या सुमारास लाचखोर आयुक्त संतोष महादेव खांडेकर वय-४८ वर्षे, महानगर पालिका आयुक्त, जालना याची त्यांच्या कुंडलिका या निवासस्थानी, मोतीबागेजवळ जालना येथे पंचासमक्ष सापळा कारवाई आजमावली असता लाचखोर संतोष महादेव खांडेकर याने लाचेची रक्कम १०,००००० (दहा लाख रुपये) स्विकारले असता त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाचे पोलीस उप अधीक्षक बी. एस. जाधवर व त्यांचे पथकाने ताब्यात घेतले व अंगझडती घेतली असता लाच रक्कम १०,००००० रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल मिळुन आला. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रीया चालु आहे.
लाचखोर आयुक्त संतोष महादेव खांडेकर वय-४८ वर्षे, महानगर पालिका आयुक्त, जालना यांचेवर पोलीस ठाणे कदीम, जालना जि.जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्रीमती माधुरी केदार, कांगणे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी बी.एस. जाधवर, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. जालना, सहायक सापळा अधिकारी, शरदचंद्र रोडगे, कोमल शिंदे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना व पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन घायवट, श्रीनिवास गुड्डर, पोलिस अंमलदार, गणेश चेके, गजानन कांबळे, मनोहर भुतेकर, संदीपान लहाने, शिवलिंग खुळे, अमोल चेके लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी केली.

0 टिप्पण्या