आरामशीन चालकाची वनपालाला धमकी, पोलिसांत तक्रार दाखल...


   अवैधरित्या वृक्ष तोड करून कटाई केलेले लाकूड आरामशीनवर आढळून आल्याने वनविभागाने त्या मशिनधारकांवर कारवाई केल्याने खवळलेल्या मालक व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी अकोला वन विभागाच्या अकोट येथील वनपालाला "पाहून घेण्याची" धमकी दिल्याने अकोट शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

   अकोला प्रादेशिक वनविभागाच्या अकोट वर्तुळ कार्यालयात कार्यरत वनपाल सुनील पाडुरंग राऊत रा.वनपाल व वनरक्षक निवास स्थान पोपटखेड रोड अकोट यांनी दिनांक १६/१०/२०२५ ला अकोट शहर पोलिस स्टेशनला १) रिजवान खान वहिद खान,
२) वहिद खान सईद खान,३) जावेद खान सईद खान,सर्व रा.गांधी मैदान जवळ अकोट यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

   कैफियतदार सुनील राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,
"मी वनपाल म्हणुन वनपरिक्षेत्र कार्यालय प्रा. अकोला यांच्या अंतर्गत अकोट वनपाल म्हणुन माहे डिंसेबर २०२२ पासुन कार्यरत आहे. मी कार्यरत असलेल्या ठिकाणी मला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथून दिनांक १५/१०/२०२५ रोजी पत्र मिळाले की, आर. के. सॉ मील, जोगबन अकोट, परवाना क्रमांक MH ४५२२ AMAK या ठिकाणी आडजात लिंब प्रजातिचे चिराण तसेच जलतन सदर सॉ मील च्या आवारामध्ये अवैधरित्या कटाई केलेले आढळून आल्याने त्यांनी गुन्हा केला असल्याने त्या गुन्ह्याची नोद करुन सदर सॉ मील परवाना धारक यांचे विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. त्यावरून दिनांक १५/१०/२०२५ रोजी आम्ही, सदर आर. के. सॉ मील सिल करण्या करीता गेलो होतो. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहीत बोरकर, विशेष सेवा वनरक्षक संघपाल सोपीनाथ तायडे, वनमजूर सुरेश कळब, वाहन चालक स्वप्नील राऊत, वनरक्षक आतिफ हुसेन व कु.पि.ए.तुरुक अश्या कर्मचाऱ्यांसह सॉ मील सिल करण्या करीता गेलो होतो".

    "दरम्यान सदर सॉ मील मध्ये मालक बिनकैफियतदार क्रं १, त्यांचे वडील बिनकैफियतदार क्रं.२ व बिनकैफियतदार क्र.३ हे त्यांचे काकासह सॉमील मध्ये हजर होते. कार्यवाही दरम्यान बिनकैफियतदार क्रं. १ ते ३ यांनी मला म्हटले की "अभी तु वर्दी पे है, तु वर्दी निकाल के आ, फिर तेरेको दिखाते है." तसेच सोबत असलेले वनरक्षक आतिफ हुसेन यांना बिनकैफियतदार क्रं.२ व ३ यांनी म्हटले की, "आपने हमारे खिलाफ कार्यवाही की, अब हम आपको ऐसी कोई गाडी आयी तो फोन पे बतायेंगे, आपने कुछ किया नहीं तो फिर आपके ऑफिस मे आके आपको बताते है."

   त्यांनी पुढे आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,"वरील बिनकैफियतदार क्र. १ ते ३ हे अवैध वृक्ष तोड व त्यासंबधी इतर सराईत गुन्हेगारीशी संबंधित असुन तसेच त्यांचा चांगला जोड जमाव असल्याने माझ्या तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे". वरील सर्व बीनकैफियतदार हे त्यांच्यावर दाखल केलेल्या वन गुन्हा क्रमांक ०१२८०/३२००० दि.२७/०९/२०२५ रोजी तसेच सॉ मील सिल बंद केल्याच्या सुड भावनेपोटी "आमचे कधीही काहीही बरे वाईट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बिनकैफियतदार क्रं. १ ते ३ यांच्या विरुध्द पत्रकार सैय्यद नुरा यांनी त्यांच्या सॉ मील येथे सुरु असलेल्या अवैध व्यवसाया सबंधी माहिती अधिकारा खाली सॉ मील बाबत माहिती मिळण्याचा अर्ज सादर केल्यामुळे यांना देखील मारहान करण्यात आली होती. त्यासबंधी सुध्दा पोलिसांत फिर्याद दाखल असुन अकोट न्यायालयात फौजदारी प्रकरण सुध्दा सुरु आहे. वरील बिनकैफियतदार गुंड प्रवृत्तीचे आहेत. तसेच यापुर्वी अकोट येथे इतर विभागात कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर घातक हल्ले झाले असल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटने बाबत मी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. अकोला यांच्या सोबत अकोला येथील कार्यालयात गेलो असल्यामुळे सदरची फिर्याद देण्यास विलंब झाला आहे. करीता वरील प्रकरणाचे योग्य ती चौकशी करुन बिनकैफियतदार क्रं.१ ते ३ यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाची तक्रार त्यांनी अकोट शहर पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. सदरहू तक्रारीच्या प्रति उपवनसं वरक्षक अकोला विभाग अकोला यांना व उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना देखील देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या