परवाच्या दिवशी राज्यातील जालना महानगर पालिका आयुक्त संतोष महादेव खांडेकर ह्याला १० लाखांच्या लाचखोरी प्रकरणी त्याच्या मोतीबाग परिसरातील राहत्या घरातून एसीबीने रंगेहाथ लाचेची रक्कम स्वीकारत असताना अटक केली होती.
लाचखोरी प्रकरणी जालना शहर महानगर पालिकेचा प्रशासक व आयुक्त संतोष खांडेकर याला कंत्राटदाराकडून दहा लाख रुपयांची लाच घेत असताना अटक केल्यावर त्याला काल न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.जालना एसीबीचे अधिकारी आज किंवा उद्या लवकरच खांडेकर याच्या शासकीय निवास स्थानी धाड टाकली असता मिळालेल्या कागदपत्रांसह रोकड व दागदागिन्याची माहिती प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात ठाणे शहर महानगर पालिकेतील अतिक्रमण विभागातील मनपा उपआयुक्त शंकर पाटोळे ह्याला लाचखोरी प्रकरणी अटक केल्यानंतर जालना मनपा आयुक्ताला लाचप्रकरणी अटक करण्यात आल्याने राज्यभरात नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांची लाचखोरीची प्रकरणे चव्हाट्यावर येत असून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जनक्षोभ उफाळून येत आहे.तर मध्यंतरी राज्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यशैलीवर हात असलेली नाराजी ह्या दोन बड्या धेंडांवर झालेल्या कारवाईने दूर झाली आहे.

0 टिप्पण्या