अखेर खदान पोलिस स्टेशनच्या मग्रूर "मंगु"चेही निलंबन...


   अकोल्यातील गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेल्या खदान पोलिस स्टेशनमधील संपूर्ण शहरांत बहुचर्चित असलेल्या "चंगू मंगु"च्या जोडीतील चंगू नंतर अखेरीस मग्रूर मंगुचेही निलंबन झाल्याने खदान पोलिस ठाण्याच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

    दोन वर्षांपासून आपल्या "धनु" नामक "आक्का" साठी जीव देण्याचीही तयारी ठेवणाऱ्या ह्या जोडीने अक्षरशः ह्या खदान पोलिस स्टेशनच्या परिसरातील निष्पाप लोकांना वेठीस धरून त्यांच्या नाकी नऊ आणले होते.

   यातील मंगूला गेल्या दोन तीन महिन्यापूर्वीच एसीबीने चार वर्षांपूर्वीच्या एका कारवाईमध्ये आरोपी सिद्ध झाल्याने अटकेची कारवाई सुरू केली होती,मात्र तो फरार झाल्याने आणि अटकपूर्व जामीन मिळविल्याने त्याच्यावरील अटकेची कारवाई टळली असली तरी तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी त्याला तात्काळ निलंबित करून मुख्यालयात जमा करण्याची कारवाई केली होती.

   तर ह्या जोडीचा आका निलंबनाच्या दरम्यानच जीवाची बाजी लावून त्या लाजिरवाण्या प्रकरणातून बाहेर निघून दोन दिवसांसाठी "रीस्टेट" होऊन सेवानिवृत्त देखील झाला आहे.

   तरी देखील अंगात असलेली मस्ती व खाकीच्या गुर्मीत असलेल्या मंगूच्या वागणुकीत काहीच फरक पडला नव्हता. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी पोलिस खात्यातच असलेल्या एका नवख्या शिपायाच्या विरुद्ध त्याच्या कथीत प्रेयसीने दिलेल्या "तक्रारीचे भांडवल" करून ह्याच मंगुने त्या शिपायाला विनाकारण पोलिस ठाण्यात बसवून ठेवत त्याच्याकडून २५ हजार रुपयांची "खंडणी" उकळत त्या शिपायाच्या प्रेयसीच्या पर्समधून सुद्धा तीन हजार रुपये काढून घेतले होते.तर त्या शिपायाचा मोबाईल देखील अवैधरित्या हिसकावून दोन दिवस ठेवून घेतला होता.हा केवळ खदान पोलिस ठाण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण पोलिस दलासाठी "लाजिरवाणा" असणारा प्रकार अकोल्यातील काही "प्रामाणिक पत्रकारांनी" उघडकीस आणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घडल्या प्रकाराची जाणीव करून दिली होती.

    मात्र त्या काळात जिल्ह्यातील नवरात्र उत्सव व त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव ह्या "खंडणीबाज" कर्मचाऱ्यावर काही कारवाई करता आली नाही.परंतु काल शनिवार दि.०४/१०/२०२५ ला पोलिस अधीक्षक अर्चित चांडक ह्यांनी ह्या "मग्रूर मंगु"च्या निलंबनाचे आदेश काढून त्याला देखील मुख्यालयात जमा केले आहे.

   मात्र त्याला खदान पोलिस ठाण्यात ह्या प्रियकर व प्रेयसीला "ब्लॅकमेल" करून खंडणी उकळण्याच्या "धंद्या"त मदत करणाऱ्या एका अधिकाऱ्यावर मात्र काहीच कारवाई झाली नाही.

   मध्यंतरी "बिछडलेली" ही चंगू मंगुची जोडी पोलिस अधीक्षकांनी काढलेल्या निलंबन आदेशाच्या अंमलबजावणीने पुन्हा एकत्र आली असून आता ही जोडी कुणाच्या विरुद्ध काय काय "कट कारस्थान" रचते हे येत्या काही दिवसांत दिसूनच येईल.एक मात्र ह्या निलंबन आदेशाने सिद्ध झाले आहे की, जिल्हाभरात बहुचर्चित असलेली ही जोडी "मेड फॉर ईच अदर" अर्थात आयुष्यभर एकमेकांना साथ देणारी व सोबत राहण्यासाठीच ईश्वराने बनविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या