अमरावती शहरातील मुख्य रेल्वे स्थानक जवळील राजकमल चौक, हमालपुरा,जयस्तंभ चौक,रेल्वे स्टेशन चौक या मार्गाना जोडणाऱ्या अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील साखळी क्रमांक ६७१/१४:१५ रेल्वे उड्डाणपुल हा सन १९६३ मध्ये सा.बा.वि.अंतर्गत ठेवकाम म्हणुन बांधण्यात आले असून सदर पुलाचे आयुष्यमान संपुष्ठात आले असून उडाणपुलाची सध्यास्थिती समाधानकारक नसल्याने त्या जागी नवीन रेल्वे उडाणपुल बांधण्याची आवश्यकता असल्याचे रेल्वे विभागाव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागास कळविण्यात आलेले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे नमुद रेल्वे उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) ची सुरुवात करण्यात आली असून प्राप्त प्राथमिक अहवालानुसार अस्तित्वात असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या गर्डरला जंग लागलेला आहे. तसेच डेक स्लॅबमध्ये अनेक ठिकाणी फ्लेक्सरल आणि शीअर क्रॅकिंग, डेक स्लॅबमध्ये गळती आणि स्टील गर्डर्सना आधार देणाऱ्या अॅब्टमेंट मध्ये गळती या सारख्या मोठ्या स्ट्रक्चरल अडचणी ROB मध्ये आढळुन आल्या आहेत. त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती यांनी दि.२३/७/२०२५ रोजी दिलेल्या पत्रामध्ये रेल्वे उडाणपुलाच्या कमकुवत घटकावरील ताण कमी करण्यासाठी सदर पुल फक्त हा हलक्या वाहतुकीसाठी खुला करुन वाहतुक मर्यादीत ठेवावी. जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा. तसेच पर्यायी मार्गाचे नियोजन करावे अशी शिफारस व विनंती केली आहे.
अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील साखळी क्रमांक ६७१/१४:१५ येथील रेल्वे पुलाचे संरचनात्मक लेखा परीक्षण (Structural Audit) प्राथमिक अहवाला वरुन या पुलावरुन होणारी वाहतुक नियंत्रीत करणे आवश्यक आहे. सदर रेल्वे उडाणपुला वरुन दुचाकी,ऑटो, चारचाकी कार वगळता सर्व प्रकारच्या बसेस,सर्व प्रकारचे मालवाहु वाहन, जड वाहन यांना प्रवेशबंदी संबंधाने सर्व प्रकारच्या जड वाहन व सर्व प्रकारचे मालवाहू वाहन,सर्व प्रकारच्या बसेस अशा वाहनांना प्रवेश बंदी करणे सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून जनहितार्थ खबरदारीची उपाय योजना म्हणुन प्रवेश बंदी करणे आवश्यक असल्याने पोलीस उपायुक्त (मुख्यालय), अमरावती शहर यांनी प्रवेश बंदी संबंधाने खालील प्रमाणे आदेश जारी केल आहे.
प्रवेश बंदी :
१) दिनांक २३/७/२०२५ चे २०:०० वा. पासुन अमरावती शहरात अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील साखळी क्रमांक ६७१/१४:१५ राजकलम चौक, हमालपुरा, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाना जोडणाऱ्या रेल्वे उडाणपुला वरुन सर्व प्रकारचे मालवाहु, हलकी व जड वाहने (४०७, मिनीडोअर,ट्रक,टिप्पर, लहान ट्रक व इतर लहान मालवाहु) तसेच सर्व प्रकारच्या बसेस यांना सदर उड्डाणपुला वरुन पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदीचे आदेश पारीत करीत आहे. (टिप - दुचाकी,ऑटो व चारचाकी कार वगळता)
पर्यायी मार्ग :
१). हमालपुरा कडुन येणारी प्रतिबंधीत वाहने बस स्टेंड मार्गे रेल्वे स्टेशन-मर्च्युरी टी पॉईट असे यावे.
२). बस स्थानक कडुन येणारी प्रतिबंधीत वाहने बस स्टेंड मार्गे रेल्वे स्टेशन-मच्युरी मर्च्युरी टी पॉईट असे यावे.
३). राजकमल चौक व जयस्तंभ चौक कडुन येणारी प्रतिबंधीत वाहने हे राजापेठ पो.स्टे. समोर-राजकमल चौक-जयस्तंभ चौक-मालवीय चौक या मार्गाचा वापर करावा.
टिप :- जड व हलके मालवाहू वाहनांना शहरात प्रवेश बंदी संबंधाने दिनांक १७/११/२०२० रोजी जारी केलेली अधिसूचना अस्तित्वात असून त्याचे अनुपालन करावे. सदर आदेश,अधिसुचनेचे जो कोणी वाहनचालक उल्लंघन करेल त्यांचे विरुध्द मोवाका १९८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. पोलीस विभागा कडुन सर्व नागरिक, वाहन धारक वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की, जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेत नमुद कालावधीत घातलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करुन पोलीस विभागास आवश्यक सहकार्य करावे.असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त,वाहतुक विभाग, अमरावती शहर विभागाचे संजय खताळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे केले आहे.



0 टिप्पण्या