अविस्मरणीय,संघर्षपूर्ण व झंझावाताची दोन वर्षे...




   गेली दोन वर्षे स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार सांभाळत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे खरोखर दबंग, कर्तव्यदक्ष, निःस्वार्थी आणि संवेदनशील मनाचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना अकोला पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत आज दोन वर्षे पुर्ण झालीत.


   एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या नियुक्तीने शहरात कशा पद्धतीने शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शंकर शेळके.


   गंभीर गुन्ह्यांचा शोध लावत अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे, ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करणे,अपहरण प्रकरण असो की दरोडा वा घरफोडी अशा गुन्ह्यांमध्ये जीवाची बाजी लावून काम करण्याची प्रवृत्ती अंगी असलेल्या या करारी व्यक्तिमत्त्वाच्या दराऱ्याची भीती आता नामचीन गुंडांनाही वाटू लागली आहे. 


  अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना आलेले यश,अशी सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या शंकर शेळके यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. 


  उत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणारे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२४ महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर जाहीर झाले. हे पदक विदर्भात प्रथमच शंकर शेळके यांच्या रूपाने कोणत्या अधिकाऱ्याला मिळाले हे विशेष. या आधी विशेष सेवा पदक आणि खडतर सेवा पदक देखील त्यांना मिळालेले आहे. 


   दोन वर्षात संवेदनशील समजल्या जाणार्‍या गुन्हे शाखेत काम करीत असताना  कोणतेही चुकीचे आरोप त्यांच्यावर किंवा त्यांच्या टिमवर झालेले नाहीत. हे विशेष.


    अकोलेकरांचे लाडके व कर्मचाऱ्यांना हवेहवेसे असलेले पोलिस अधिकारी,प्रामाणिक, निस्पृह,अद्वितीय,अलौकिक, प्रभावशाली, हरहुन्नरी, अष्टपैलू व तितकेच कणखर बाणा असलेल्या शंकर शेळके यांना पुढील वाटचालीसाठी शुभकामना...!

शिवदास जामोदे
अनिल दंदी
_____________________________


खरचं,शेळके सर म्हटलं तर खाकीतील ‘रुबाब'दार व्यक्तिमत्व. त्यांनी आपल्या कामातून ठसा उमटविला. गेल्या २ वर्षापासून ते अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची प्रमुख म्हणून जबाबदारी प्रभावीपणे सांभाळतायत.. विशेष म्हणजे, काही तत्कालीन अधिकाऱ्यांमुळे स्थानिक गुन्हे शाखेवर अनेकदा ताशेरे ओढले गेले. अनेकदा काही पोलिसांमुळे एलसीबी अडचणीत येऊन अर्थातच विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, शेळके सरांनी LCB ची जबाबदारी  स्वीकारल्यानंतर प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेल्या प्रश्नांना विराम लागला. मागील २ वर्षात त्यांची कारकीर्द प्रभावीपणे पार पडली. अयशस्वी आणि तपासात अडचणी ठरणारे खुलासे अर्थातच गुन्हे त्यांच्या नेतृत्वात उघड झाले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेकदा त्यांना सन्मान चिन्ह देत सन्मानित करण्यात आलं. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याला जिल्ह्यात त्यांचं मोठ प्राधान्य आहे. आव्हानात्मक तपासाच्या शाखेत त्यांनी काम करताना कामाचा धडाका बोलण्यापेक्षा कामातून आपल्या कामाचा ठसा उमटविण्यात मोठं प्राधान्य दिलंये. 

    दुसरीकडे पाहलं तर अकोला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही गुन्हा घडला की सर्वप्रथम त्यांची ‘व्हीजीट’ निश्चित राहतं. केवळ पाहणीच नव्हेतर त्यांच्याकडून तपासात महत्त्वाचा हातभार मिळतो. त्यामुळे स्थानिक पोलिसांना गुन्हा उघड करण्यास मोठा फायदा होता. शेवटचं सांगायला गेलो होतो तर जिल्ह्यात अनेक घडणारे काही गोष्टी अर्थातच घटना त्यांच्यामुळे आधीच सावरले गेलेये.. असंच कार्य तुमचं पुढेही सुरू राहो... ह्याच तुम्हाला माझ्याकडून छोट्याशा शुभेच्छा.

आपलाच
अक्षय गवळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या