फक्त २ हजाराची लाच घेणाऱ्या यवतमाळच्या ३ "भुक्कड आरटीओ"ना एसीबीने पकडले...



राज्य शासनाने संपूर्ण विभागांची कार्यप्रणाली ऑन लाइन करून जनतेसाठी अत्यंत पारदर्शक कारभार करून ठेवल्यामुळे लाचखोरांना पैसे खाण्याची कुठेही संधी राहीलेली नाही.त्यामुळे लाचखोरीचे प्रमाण खूप कमी झाले आहे.मात्र तरी देखील मिळेल त्याठिकाणी तोंड मारून दोन पैसे पदरात पाडून घेण्यासाठी काही माणसाच्या जातीतील डुकरे "भ्रष्टाचाराच्या घाणी"त तोंड खुपसतच असतात.

भ्रष्टाचाराच्या घाणीत लोळणाऱ्यांचा विभाग म्हणून पूर्वी आरटीओ विभागाकडे पहिले जायचे, मात्र गेल्या काही दिवसांपासून हा विभाग आणि त्यांची सर्वच कामे "ऑन लाइन" झाल्यामुळे ह्या विभागातील भ्रष्टाचाराची घाण बऱ्याच प्रमाणांत कमी झालेली पाहावयास मिळत आहे.मात्र तरी देखील मिळेल तिथे संधी शोधणारे लाचखोर "शिकारी" आयतेच "सावज" जाळ्यात आल्यावर त्याची "शिकार करण्याची संधी" सोडत नाहीत.नाही "मणभर" तर किमान "कणभर" तरी वाट्याला येईल म्हणून मिळेल त्यात समाधान मानून "मिले सो लखलाभ" ह्या वृत्तीने "चिल्लर" रकमेसाठीही सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीतच असतात.


  गेल्या दोन महिन्याआधी चंद्रपूरच्या तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या लक्कडकोट तपासणी नाक्यावर चंद्रपूरच्या आरटीओला अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी फक्त ५०० रुपयांच्या चिल्लर लाचेच्या रकमेसाठी पकडले होते. अमरावती एसीबीच्या "ह्या ट्रॅप"ची त्यावेळी संपूर्ण राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती.


    त्यानंतर आता काल यवतमाळच्या आरटीओला २००० रुपयांची लाच घेत असताना यवतमाळच्या एसीबीने पकडल्याने विदर्भातील आरटीओ "भुक्कड" झाल्याचे दिसून येत आहे.शासनाने सर्व कारभार ऑन लाइन केल्यामुळे राज्यातील सर्वांत जास्त लाचखोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विभागातील जे अधिकारी हजार पाचशेच्या "नोटेने दात कोरून" ती नोट दलालांच्या अंगावर फेकून द्यायचे आज त्याच एका एका "पाचशेच्या नोट" साठी स्वतःची नोकरी देखील धोक्यात घालत आहेत हे पाहून आश्चर्य वाटत आहे.


    काल पुसद शहरात कॅम्प सुरू असताना वाहन परवाना देण्यासाठी दहा ड्रायव्हिंग स्कूल चालकांकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे लाचेची २००० रुपये रक्कम जमा करून ती प्रत्यक्षात तीन आरटीओ अधिकारी आपसांत वाटून घेणार होते.ह्यावरून राज्यातील गर्भश्रीमंत असलेल्या परिवहन विभागातील आरटीओ अधिकारी किती "चिल्लर व भुक्कड"
झालेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे.


    फक्त दोन हजारांची लाच घेताना तीन आरटीओ अधिकारी जाळ्यात अडकविण्यासाठी यवतमाळच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या महिला संचालिकेने "करेक्ट कार्यक्रम" केला असून यवतमाळचे तीन "भिक्करचोट" अधिकारी गजाआड झाले आहेत.


    आरटीओ विभागातील अधिकारी लाखोंची लाच घेताना अटक अशा बातम्या ह्यापूर्वी  ऐकण्यात आणि वाचण्यात आल्या असतील. पण यवतमाळमध्ये काल लाचखोरीचा एक वेगळाच किस्सा घडला. फक्त दोन हजारांची लाच घेताना आरटीओचे तीन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. शिकाऊ आणि कायम स्वरुपाचा परवाना देण्याच्या बदल्यात दलालाच्या माध्यमातून दोन हजारांची लाच या अधिकाऱ्यांनी घेतली. सुरज गोपाल बाहीते,वय ३२वर्षे, मयुर सुधाकर मेहकरे,वय ३०वर्षे आणि बिभिषण शिवाजी जाधव,वय ३० वर्षे अशी अजून "दुधाचे दातही न पडलेल्या अगदी कोवळ्या" वयाच्या लाचखोर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची नावे आहेत.


    शिकाऊ आणि कायम वाहन परवाना देण्याकरिता अधिकृत शासकीय चलनाच्या व्यतिरिक्त २०० रुपये प्रमाणे १० क्लासेसकडून एकूण दोन हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी आरटीओतील वरील तीन अधिकाऱ्यांसह खासगी एजंट, दलालाला एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई पुसद येथे आरटीओ कॅम्प सुरू असताना शासकीय विश्रामगृह परिसरात करण्यात आली. यवतमाळ येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात हे अधिकारी कार्यरत आहेत. बलदेव नारायण राठोड,वय २९ वर्षे, रा.गव्हा ता.मानोरा जि.वाशिम असे लाच स्वीकारणाऱ्या आरटीओच्या दलालाचे नाव आहे.


    लायसन्स कँपदरम्यान आरटीओ अधिकारी लाचेची मागणी करतात अशी लेखी तक्रार सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या एका महिला संचालिकेने ७ मे २०२५ रोजी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी कारवाई करून ह्या तिन्ही  अधिकाऱ्यांना दलालासह रंगेहात लाचेची रक्कम घेत असताना पकडले. याप्रकरणी पुसद शहरातील वसंतनगर पोलिस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या