मुख्यमंत्री, महराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्या दरम्यान राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये वेबसाईट सुधारणा, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, क्षेत्रीय कार्यालयाला भेटी, ई ऑफिस प्रणाली, आर्थिक व औदयोगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रीत बुध्दीमत्ता तंत्राचा वापर, नाविन्यपुर्ण उपक्रम इत्यादी मुदयांवर दि.०७/०१/२०२५ ते ३०/०४/२०२५ पर्यंत कार्यालयीन कामकाजामध्ये सुधारणा करणेबाबत प्रोत्साहीत करण्यात आले होते.
अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्या दरम्यान तालुका स्तरावर अयोजीत करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये जिल्हयातील ४ उपविभागीय कार्यालय तसेच २३ पोलीस स्टेशनने सहभाग नोंदवून खालील प्रमाणे कार्यवाही.
> वेबसाईट :- अकोला पोलीस दलाच्या www.akolapolice.gov.in वेबसाईटमध्ये सुधारणा करून वापर करण्यास सुलभ.
> सुकर जीवनमान सामन्य जनेतेकरीता Whatsapp ChatBot 9404691022, पारपत्र, चारित्र पडताळणी, परवाने यांचा त्वरीत निपटारा, डायल ११२ अंतर्गत प्रतिसाद वेळेत सुधारणा. सुरक्षित रस्ता अभियान राबवून अपघात मध्ये घट करण्याचा प्रयत्न.
> कार्यलयीन स्वच्छता अभिलेखाची छाननी, मुदतबाहय अभिलेख व जड वस्तु नाश.पो.स्टे. परिसरात असलेली वाहने मुळ मालकांचा शोध घेवून परत तसेच ६१ बेवारस वाहनांचा लिलाव सुमारे ५,००,०००/-रू मध्ये करून शासनखाती जमा,
> तक्रार निवारण : आपले सरकार, पी. जी. पोर्टल वरील तसेच प्राप्त तकार अर्जाची मोठया प्रमाणात निर्गती तसेच तक्रार निवारण दिनाचे अयोजन करून तक्रारींचा निपटारा.
> कार्यालयीन सोयी सुविधा अभ्यागत कक्ष, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरुष, महिला तसेच अभ्यागतांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह, नागरीक सहायता कक्ष.
> क्षेत्रीय कार्यालयांना भेटी वरीष्ट अधिका-यां मार्फत पोलीस स्टेशन येथे भेट देवून कामकाजात सुधारणा करण्याकामी मार्गदर्शन, अधिकारी व अंमलदार यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न. पोलीस अधिकारी व अंमलदारांची चौकी, गाव भेटी, कॉर्नर मोहल्ला मिटींगव्दारे जनतेशी संवाद.
आर्थिक व औदयोगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन एम.आय.डी.सी. संघटना, क्रेडाई संघटना, सराफा, किराणा यांचेशी समन्वय साधुन उदयोगास पोषक वातावारण निर्माण करण्यासाठी उपययोजना.
> अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर नवीन तीन कायदयाच्या कार्यशाळा अयोजन, ई-अकॅडमी, आय गॉट कर्मयोगी व्दारे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन.
> नाविन्यपूर्ण उपक्रम S.E.V.A (SERVICE EXCELLENCE VICTIM ASSISTANCE) प्रणाली कार्यान्वित, नागरिकांचे हरविलेले मोबाईल मोठया प्रमाणात परत, विदयार्थी सुरक्षे संबंधी 'अकोला केअर्स' (Akola C.A.R.E.S) उपक्रम राबविण्यास सुरुवात.
या उपक्रमा अतंर्गत केलेल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन यांचे मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, परिक्षेत्र अमरावती यांना सादरीकरण करण्यात आले वरून अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्हयातील पोलीस स्टेशन मधुन पो.स्टे.अकोट ग्रामीण परिक्षेत्रातील सर्व पो.स्टे.मधुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री यांचा कार्यालयीन सुधारणा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवून अकोला जिल्हा पोलीस दल सर्व क्षेत्रात उत्कृष्ट सेवेसाठी आणि नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असेल.अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या