उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एक महिला तिच्या चुलत सासऱ्या सोबत पळून गेली असून जातांना तिने घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने,नगदी आणि तिच्या दोन मुलींनाही सोबत घेऊन गेली आहे. पोलीस त्या महिलेचा आणि तिच्या चुलत सासऱ्याचा शोध घेत आहेत. लवकरच दोघांचाही शोध घेतला जाईल,असे पोलिसांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत उत्तर प्रदेशात सासू आणि जावई,मुलीचा सासरा,आत्याचे सख्ख्या भाच्यासोबत लग्न,त्यांचे पळून जाणे आणि प्रेमप्रकरण हे बातम्यांमध्ये चावले आणि पहिले होते. आता सून तिच्या चुलत सासऱ्यासोबत इटावाला पळून गेली आहे. ही महिला तीन मुलांची आई आहे. तीला दोन मुली आणि एक मुलगा आहे.जातांना ती घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि तिच्या दोन मुलींनाही सोबत घेऊन गेली आहे. हे संपूर्ण प्रकरण इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील आहे.
पीडित पती गेल्या एक महिन्या पासून आपल्या पत्नीचा शोध घेत आहे आणि पोलिस स्टेशन आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विनवणी करत आहे, परंतु आतापर्यंत त्याच्या पत्नीचा कोणताही पत्ता लागलेला नाही. आता तर त्या पतीने घोषणाच केली आहे की जो कोणी त्याच्या पत्नीला शोधून काढेल किंवा त्या दोघांचा पत्ता देईल त्याला २०,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. पीडित व्यक्ती हा साधारण वाहन चालक असून गाडी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. त्याने सांगितले की तो गेल्या महिन्यात ३ एप्रिल रोजी गाडी घेऊन कानपूरला गेला होता.
तो जेव्हा कानपूरहून घरी परत आल्यावर त्याला दिसले की त्याची पत्नी आणि दोन मुली घरातून गायब आहेत. नंतर त्याला कळले की त्याचा काका असलेला एक माणूस त्याच्या पत्नीसोबत पळून गेला आहे. बायकोने मुलाला घरी सोडले आहे. ती तिच्या चार अंगठ्या, एक हार, एक मंगळसूत्र आणि ५०,००० रुपये घेऊन घराबाहेर पडली. पीडितेच्या पतीने सांगितले की,पोलिस स्टेशन प्रभारींनी ३ एप्रिल रोजी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता.
पोलीस स्टेशन प्रभारी काय म्हणाले?
त्यांनी सांगितले की, अहवाल बदलून नंतर बेपत्ता व्यक्तीचा खटला दाखल करण्यात आला असला तरी, त्यांच्या पत्नीचा शोध घेण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. तो ३ एप्रिलपासून त्याच्या पत्नीचा शोध घेत आहे. या संपूर्ण प्रकरणात, उसराहार पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की, पीडितेच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच त्या महिलेची आणि तिच्या सासऱ्यांची माहिती कळेल.




0 टिप्पण्या