पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी हगवनेचे मामा असलेले आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्याकडील "कारागृह उप महानिरीक्षक" ह्या पदांचा अतिरिक्त पदभार आज राज्य शासनाच्या गृह विभागाने तडका फडकी काढून घेतला असून तो स्वाती साठे,अरुणा मुगुटराव व वैभव आगे या तीन अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जालिंदर सुपेकर यांच्याकडील तुरुंग उपमहानिरीक्षक पद जैसे थे ठेवून त्यांच्याकडून उपरोक्त तिन्ही अतिरिक्त पदांचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. सुपेकर यांच्याकडे असलेली जबाबदारी इतर तीन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागातील अत्यंत महत्वाचे असलेले,"कारागृह उप महानिरीक्षक" हे कारागृह विभागातील अत्यंत महत्वाचे व जवाबदारीचे पद आहे. सध्या कारागृह विभागाच्या "कारागृह उप महानिरीक्षक" या संवर्गात ५ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी २ पदे भरलेली असून ३ पदे रिक्त आहेत.
जालिंदर सुपेकर यांच्याकडे "विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे" या पदाचा नियमित कार्यभार आणि कारागृह विभागातील "कारागृह उप महानिरीक्षक" या संवर्गातील पाच पदांपैकी रिक्त असलेल्या तीन पदांचा (नाशिक विभाग,मध्य विभाग,छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार आहे.
"विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे" हे जबाबदारीच्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, या पदानंतर महत्वाचे पद आहे.त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या "कारागृह उप महानिरीक्षक" या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा (नाशिक विभाग, नाशिक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या योग्य नसल्याने तसेच, "कारागृह उप महानिरीक्षक" या कनिष्ठ संवर्गातील पदाचा कार्यभार "विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे" या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिका-याकडे सोपविणेही उचित नसल्याचे कारण पुढे करीत जालिंदर सुपेकर यांच्याकडील "कारागृह उप महानिरीक्षक" या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कारागृह विभागातील इतर अधिका-यांकडे सोपविण्याचा निर्णय गृह विभागाने घेत उपरोक्त तिन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार पुढील व्यवस्था होईपर्यंत दुसऱ्या समकक्ष अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार,
१).श्रीम.स्वाती साठे, कारागृह उप महानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे,यांच्याकडे कारागृह उप महानिरीक्षक, पूर्व विभाग, नागपूर असा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
२).श्रीम.अरुणा मुगुटराव अधीक्षक, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह,नाशिक,यांच्याकडे
कारागृह उप महानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिकचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.तर
३).वैभव आगे अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नागपूर,यांच्याकडे कारागृह उप महानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर हा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
याबाबतचा शासन आदेश आजच गुरुवार दि.२९/५/२०२५ रोजी सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने गृह विभागाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.








0 टिप्पण्या