पोलिस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या...




    राज्य शासनाच्या गृह खात्याने पोलिस विभागातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले असून त्यात अनेक कालावधी पूर्ण न झालेल्या काही जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.


    अकोल्यात गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली नागपूरला राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ ला करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात उप आयुक्त पदावर कार्यरत असलेले अर्चित चांडक  यांची बदली करण्यात आली आहे.


     तर प्रोबेशन काळात अकोला जिल्ह्यातील अकोट उप विभागात सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेल्या व सद्यस्थितीत सांगली येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रितू खोकर यांना धाराशिव जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या