अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी हे पद गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून रामदास सिद्धभट्टी ह्यांची अप्पर आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्यामुळे रिक्त झाले होते.त्या पदावर शासनाने प्रमोद राहुल गायकवाड ह्यांची नियुक्ती केली आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भू संपादन विभागाचे उप जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असलेले प्रमोद राहुल गायकवाड ह्यांना शासनाने नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देत त्यांना अकोल्यात नियुक्ती देण्यात आली आहे.अकोल्यातील अप्पर जिल्हाधिकारी हे पद रामदास सिद्धभट्टी ह्यांना अप्पर आयुक्त पदावर पदोन्नती दिल्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यांपासून रिक्त होते.
प्रमोद गायकवाड ह्यांच्या नियुक्तीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त असलेले पद भरले गेल्याने जिल्ह्यातील गरजू लोकांना न्याय मिळाला असून त्यांची विनाकारण अडकून पडलेली कामे मार्गी लागण्याची आशा व्यक्त केल्या जात आहे.अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात तीन ते चार उप जिल्हाधिकारी पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त असल्याने नागरिकांच्या अनेक कामांचा खोळंबा होत आहे, तर त्या रिक्त पदांचा पदभार कार्यरत उप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याने त्यांच्याकडे असलेल्या विभागातील कामे म्हणा वा फायली प्रलंबित पडत आहेत.
रिक्त पदांच्या बाबतीत जिल्ह्यातील आमदार व खासदार हे अनभिज्ञ असल्याने किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने नागरिकांची मात्र कामे प्रलंबित पडत आहेत. जिल्ह्यातील जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच त्यांच्या कामांच्या बाबतीत आशा,अपेक्षा आहेत. राजकीय नेते मंडळी व लोक प्रतिनिधीं कडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती नाही हे सूर्य प्रकाशा इतके सत्य आहे,आणि हीच "वास्तविकता" आहे.


0 टिप्पण्या