राज्यातील भाजपा जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर...



   भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून स्थानिक आमदारांना जिल्हा व शहर भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा पायंडा पडला होता.मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपात "एक व्यक्ती एक पद" अशी घोषणा करीत स्थानिक लोक प्रतिनिधींकडून ही अध्यक्षपदे काढून घेण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले होते.
   
   आज ह्या बाबीची अंमलबजावणी करण्यात आली असून राज्यातील सर्वच ग्रामीण व शहरी भागात जिल्हा अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. पूर्वीच्या अध्यक्षांना बदलून त्यांच्या ठिकाणी नवीनच अध्यक्षांची पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

    भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीतील निवडणूक अधिकारी असलेले आमदार चैनसुख संचेती यांनी आज ह्या जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा करणारे नियुक्तीपत्रच जाहीर केले आहे. 


     अकोला जिल्ह्यातील ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर ह्यांच्या गटाचे अकोट पंचायत समितीचे माजी सभापती संतोष शिवरकर उर्फ पिंटू अण्णा ह्यांची अकोला जिल्हा भाजपाचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या