अनिता मेश्राम,अकोला जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी...



   महाराष्ट्र शासनाने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या असून त्यात रिक्त असलेल्या जिल्हा परिषद, अकोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिता मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    १.) सी.के. डांगे (IAS:SCS:२०१०) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ,मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२.) संजय काटकर(IAS:SCS:२०१४) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३.) श्रीमती अनिता मेश्राम (IAS:SCS:२०१५) व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ,मुंबई यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

४.) अभिनव गोयल (IAS:RR:२०१६) जिल्हाधिकारी, हिंगोली यांना कल्याण- डोंबिवली महानगर पालिका,कल्याण येथे महानगर पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५.) श्रीमती आयुषी सिंग (IAS:RR:२०१९) यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त,नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या