अकोट तालुक्यातील ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोपटखेड मार्गावरील दहीखेल फुटकर शेतशीवारात आज सकाळीच उघडकीस आलेल्या रमण चांडक खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्याने ह्या प्रकरणातील गुंता अखेर सुटला आहे.
मृतक रमण रामचंद्र चांडक,वय ६० वर्ष रा.गीता नगर,बायपास,अकोला यांच्या हत्येप्रकरणी फिर्यादी संदीप किरणकुमार चांडक,वय ३८ वर्ष रा.गोकुळ कॉलनी,अकोट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन, आकोट ग्रामीणला अप. क्र.१७२/२०२५ नुसार कलम- १०३(१) BNS अन्वये दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी गजानन साहेबराव रेळे,वय ५५ वर्ष रा.वडाळी सठवाई ता.अकोट जिल्हा अकोला यांस अटक करण्यात आली आहे.
मृतक व आरोपी यांचे टिप्पर व गाड्यांचे देवाण-घेवाण व विक्रीच्या अनुषंगाने पैशाचे व्यवहार असून याच आर्थिक व्यवहारातून आरोपीने संबंधित मृतक यास अर्धवट बांधकाम केलेल्या ठिकाणी घेऊन जाऊन स्लॅबवरील दगडावर डोके आदळल्याने मृतकाचा अती रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला आहे व त्याचे मरणास कारणीभूत ठरला. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने माखलेला दगड जप्त केला आहे.
या प्रकरणातील आरोपी गजानन साहेबराव रेळे ह्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि. योगिता ठाकरे व पो.निरी.किशोर जुनघरे हे करीत आहेत.
रमण चांडक खून प्रकरणातील आरोपी गजानन ह्याचे गेल्यावर्षी काही लोकांकडून अपहरण करण्यात आले असल्याची माहिती असून त्याची ग्रामीण पोलिस स्टेशनला त्याबाबत "मिसिंग" सुद्धा दाखल करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून आर्थिक वाद सुरू असल्याचे समजते.





0 टिप्पण्या