अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतराजीच्या कुशीत वसलेल्या अकोट पोपटखेड मार्गावरील पोपटखेड शेतशिवारात बंद पडलेल्या अवस्थेत असलेल्या एका जनावरांच्या हाडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याच्या इमारतीमध्ये स्थानिक लोकांना मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदरहू व्यक्तीची आत्महत्या की खून या चर्चा परिसरात रंगलेल्या असतानाच अकोट ग्रामीणच्या पोलिसांनी हा खूनच झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दिशेने तपास सुरू केला आहे. अकोट तालुक्या तील पणज येथील मुळ रहिवाशी असलेले व सद्यस्थितीत आकोला येथे वास्तव्यास गेलेले व्यावसायिक रमन चांडक नामक इसमाचा खुन झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली असून त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आर्थिक देवाण घेवाणीतून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविल्या जात असून संशयाच्या आधारावर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.
या प्रकरणांत अकोट ग्रामीण पोलीसांचा तपास सुरु असून लवकरच खरे काय ते समोर आणल्या जाईल व आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास ठाणेदार किशोर जुनघरे यांनी व्यक्त केला आहे.



0 टिप्पण्या