गेल्या महिन्यात शासनाने एक पत्र काढून विविध दैनिकांचे, वृत्त वाहिन्यांचे पत्रकार, प्रतिनिधी यांना प्रवेश देणेबाबत आदेश काढून त्यांना त्यांचे ओळखपत्र (RFID CARD) व सर्व सुरक्षा विषयक तपासणी करुन दुपारी ०२.०० नंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा असे निर्देश निर्गमित करण्यात आले होते.याबाबत तसे पोलीस उपायुक्त,मंत्रालय सुरक्षा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सूचित करण्यात आले होते.
त्यानुसार ह्या सर्व प्रतिनिधींना सकाळच्या सत्रात मंत्रालयात प्रवेश नाकारण्यात आला होता.मात्र ह्याबाबत सर्व पत्रकारांनी एकजूट दाखवित शासनाच्या ह्या आदेशाचे विरुद्ध आवाज उठविल्याने अखेर शासनाला माघार घ्यावी लागली असून दि.२४ मार्च,२०२५ अन्वये देण्यात आलेले उपरोक्त निर्देश या पत्रान्वये रद्द करण्यात येत असल्याचे आदेश दिनांक ४/४/२०२५ ला नव्याने काढण्यात आले आहेत.सर्व पत्रकारांना आता मंत्रालयात पूर्वीप्रमाणेच प्रवेश दिला जाणार आहे.
डॉ. प्रविण ढिकले,कक्ष अधिकारी, गृह विभाग,मंत्रालय मुंबई यांच्या स्वाक्षरीने ही आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.



0 टिप्पण्या