अकोला पोलिसांवर बंदूक रोखणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता...


अमरावती शहरातील स्थानिक गाडगे नगर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या अकोला पोलिस दलाच्या पथकावर पिस्तूल दाखवून गोळीबार करणाऱ्या आरोपी राजेश बाजीराव राऊतला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असून या ही प्रकरणात अकोला पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे. ही घटना २०२२ मध्ये घडली आहे.


    राजेश राऊत नामक आरोपीविरुद्ध अकोल्यासह मध्य प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये बरेच फौजदारी गुन्हे दाखल होते.अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्याअंतर्गत राजेश राऊत यांच्या नावाने अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. यादरम्यानच्या काळात अकोला पोलिसांना आरोपी राजेश राऊत अमरावतीमध्ये असल्याचे कळले असता त्याला पकडण्यासाठी अकोला पोलिसांचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी अमरावतीला पोहोचले.राजेश राऊत रात्री त्याच्या नातेवाईकाच्या घरी राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याचा मित्र पवनसोबत रुक्मिणी नगर मधून कारने निघाला. अकोला पोलिसांच्या पथकाने राजेश राऊतला पकडण्या साठी त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत असताना राजेश राऊत याची चार चाकीगाडी विजेच्या खांबाला धडकली. त्याच वेळी अकोला पोलिस त्या वाहना जवळ पोहोचताच, राजेश राऊत देखील वाहनातून खाली उतरला आणि त्याने कमरेला लावलेले पिस्तूल काढले आणि पोलिसांवर  रोखले.


    परंतु राजेश राऊतने जवळच्या पिस्तुलातून  गोळीबार करण्यापूर्वीच पोलिसांनी दोन राउंड गोळीबार केला आणि राजेश राऊतला जागीच पकडले.


   त्याच्याविरुद्ध गाडगे नगर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७, ३५३, ३४ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले असता जिल्हा आणि सत्र  न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने बचाव पक्षाचे युक्तिवाद स्वीकारले आणि आरोपींना निर्दोष मुक्त केले.याप्रकरणात अकोला पोलिससह गाडगेनगर,अमरावतीचे पोलिस आपली बाजू मांडण्यात कमी पडले आणि आरोपीचे वकील अ‍ॅड.मुर्तझा आझाद यांनी यशस्वीरित्या वकिली करून आरोपी राजेश राऊत ह्याला निर्देश मुक्त करण्यासाठी शक्य असतील तेव्हढे  प्रयत्न केलेत व त्यात ते यशस्वी देखील झालेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या