सी.ओ.दादाराव डोलारकरची दादागिरी, अंजनगाव नगर पालिकेत मनमानी..?



   अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचे सीओ अर्थात मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांची "दादागिरी" दिवसेंदिवस वाढतच चालली असून आता तर त्यांनी शहरातील पत्रकारांना "अपमानित" करून  त्यांचे ओळखपत्र हिसकावण्याचेही "धंदे सुरू" केले असल्याचे कालच्या घटनेवरून दिसून येत आहे.



    नदी नाल्यातून मासे पकडून स्थानिक बाजारात त्यांची विक्री करून आपल्या परिवाराचे पोट भरणाऱ्या,गोरगरीब  व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगर पालिकेत मुख्याधिकारी डोल्हारकर यांना भेटण्यासाठी काही पत्रकार गेले होते.ह्या लोकांची समस्या दूर करण्याकरिता गेलेल्या स्थानिक पत्रकारांसोबत अत्यंत उद्धटपणे वागून अरेरावी करीत त्या पत्रकाराचे ओळखपत्र हिसकावून घेण्याचा अत्यंत चीड आणणारा प्रकार मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांनी केल्याने त्यांच्या विषयी स्थानिक पत्रकारांत तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.


    अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे सीओ दादाराव डोल्हारकर यांच्या सोबत पत्रकार महेंद्र भगत  हे आठवडी बाजारातील मासेमारी व्यावसायिक यांना जागा देण्यासंदर्भात चर्चा करण्याकरिता गेले असता,डोलारकर यांनी पत्रकार महेंद्र भगत यांचे ओळखपत्र हिसकावले आणि चर्चा करण्याकरिता आलेल्यांना अभद्र वागणूक दिल्याचे पत्रकार व व्यावसायिकांनी सांगितले.
झालेल्या प्रकराणे काही काळ नगरपरिषद कार्यालय व परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.मुख्याधिकारी डोलारकर ह्याच्या ह्या वागण्याची जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे तक्रार करून त्यांच्या कारकिर्दीत होत असलेल्या मनमानी कारभाराची देखील तक्रार करण्यात येणार असल्याचे ह्या पत्रकारांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या