अकोला पोलीस दलात सेवा (S.E.V.A.) प्रणाली कार्यान्चीत...



   मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा कार्यकम अंतर्गत राहणीमान,तक्रारीचे निवारण, कामाच्या ठिकाणी सुविधा संबंधीत उपक्रमा अंतर्गत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. अकोला जिल्हयामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या अभ्यागतांची, तक्रारदारांची तकार कमीत कमी वेळात विनाविलंब पुर्ण होवून, त्यातुन त्यांचे समाधान होणे हे असुन, त्यामुळे पोलीसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. सदर यंत्रणा राबवितांना पोलीस स्टेशनमध्ये विविध कामासाठी आलेल्या अभ्यागतांची माहिती या यंत्रणेव्दारे संगणकामध्ये संकलीत होणार आहे.


   त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यात दि. २७/०३/२०२५ पासुन अकोला जिल्हयात S.E.V.A. (Service Excellence and Victim Assistance) ची प्रायोगीक तत्वावर अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. दि. २१ फेबुवारी व २५ फेबुवारी २०२५ रोजी विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे सेवा बाबत पोलीस स्टेशनचे सेवा सेल मध्ये काम करणारे अंमलदार यांना सेवा सेल हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर उपक्रमा करीता लागणारे टॅब डी.पी.सी. फंडातुन उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यानुसार अकोला जिल्हयातील २३ पोलीस स्टेशन, ४ उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,अंतर्गत सेवा कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे.

     सदर सेवा यंत्रणा कार्यन्वीत करण्याचा मुळ उददेश, पोलीस स्टेशन,उप विभागीय पो.अ. कार्यालय येथे आलेल्या तक्रारीच्या निर्गतीचे काम कमीत कमी वेळात विनाविलंब पुर्ण होवून त्यातुन तक्रारदाराचे समाधान करणे हा आहे. त्यामुळे पोलीसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. सदर यंत्रणा राबवितांना पोलीस स्टेशन मध्ये विविध कामासाठी आलेल्या अभ्यागतांची थोडक्यात माहिती या यंत्रणेव्दारे संकलीत होणार आहे. तक्रारदाराने पोलीस स्टेशनला पुर्वीच तक्रार दिली असल्यास त्याबददल केंद्रीय कार्यालयामार्फत संबंधीत पोलीस स्टेशनला विचारणा करण्यात येणार आहे.


   कार्यप्रणाली : अकोला घटकातील प्रत्येक पोलीस स्टेशन, उप विभागीय पो.अ.कार्यालय येथे भेट देणारे अभ्यांगत यांची नोंद सेवा प्रणालीचे माध्यमाने देण्यात येईल. यामध्ये अभ्यांगताचे नाव, मोबाईल नंबर, फोटो, येण्याची वेळ कोणाला भेटायचे आहे, तक्रारीचे स्वरुप, येण्याजाण्याची वेळ इत्यादी डाटा फिडींग सेवा प्रणालीचे माध्यमाने केंद्रीयस्तरावर करण्यात येणार असून, सायबर सेल यांचे सर्व्हर मध्ये घेण्यात येईल. या कार्यप्रणालीवर सायबर सेल सेवा कक्ष यांची देखरेख असणार आहे.

    Feedback: अभ्यांगतांच्या, तक्रारदारांच्या तक्रारीच्या तपशिलाचे नोंदीबाबत पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांचा दररोज आढावा घेण्यात येणार आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक यांनी दर ३ दिवसांनी आढावा घेणार आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये सेवा कक्ष हे या कार्यासाठी कार्यन्वीत करण्यात आले आहे. त्यामध्ये १ सपोनि ३ पोलीस अंमलदार हे सदर अभ्यांगतांच्या नोंदीवरुन संबंधीत अभ्यांगतांना फोन,मोबाईल इत्यादी व्दारे संपर्क करून अभ्यांगतांचे पोलीस स्टेशनच्या तक्रार निवारण व सदत याबाबत अभिप्राय घेतील व त्याचे तक्रारींचे निराकरण झाले किंवा नाही याबाबत माहीती घेवुन त्याचे ७ दिवसात तकारीचे निवारण करण्यास मदत करतील. तकारीचे निराकरण न झाल्यास वरीष्ठ अधीकारी स्वतः विचारपुस करतील व शंका निरसन करणार आहेत. जनतेला तात्काळ व सुकर सेवा देण्यास अकोला पोलीस सदैव तत्पर आहे. नागरीकांनी विनासंकोच आपली तकार पोलीस स्टेशनला नोंदवावी, नागरीकांच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली आहे हे Feedback system च्या माध्यमातुन पोलीस स्टेशनचे कामकाजावर आणखी बारकाईने लक्ष ठेवल्या जाणार आहे.अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शंकर शेळके,पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी अकोला जिल्हा पोलीस दल यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या