खदान पो.स्टे.चा एसीबीचा फरार आरोपी पो.कॉ.विजय चव्हाणचा जामीन अर्ज फेटाळला...



आयुष्यभर चोरांच्या मागे धावणारा पोलिस कॉन्स्टेबल विजय चव्हाण गेल्या काही दिवसांपासून स्वतःच एसीबीच्या पोलिसांपासून दूर पळत असून चोरासारखा कुठेतरी लपून बसलेला आहे.चोरासारखे आयुष्य जगत असतानाच त्याने अकोल्या तील कोर्टात जामीन मिळण्यासाठी दाखल केलेला त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला असल्याने त्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांपुढे शरणागती पत्करण्याशिवाय आजतरी कोणताही पर्याय उरलेला नाही.

अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनला गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेला पोलिस कॉन्स्टेबल विजय चव्हाण उरळ पोलिस स्टेशनला २०१९ साली कार्यरत असताना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून २० हजार रुपये हप्ता मागितल्याने एसीबीच्या कारवाईत अडकला असून त्याच्याविरुद्ध उरळ पोलिस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तेव्हापासून तो फरार झाला आहे.


सन २०१९ मध्ये अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशनला कार्यरत असताना त्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला दरमहा २० हजार रुपयांची लाच मागणी ह्या विजय चव्हान याने केली होती. त्याबाबत अकोला एसीबीकडे दि. ४/१२/२०१९ ला तक्रार प्राप्त झाली असता दि. ८/१२/२०१९ ला त्याची पडताळणी करण्यात आली होती. परंतु त्याला एसीबीच्या "सापळ्या"ची कुणकुण लागल्याने त्याने ही रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्याच्यावर लाच मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असता त्याने "रेकॉर्डिंग" मधील "आवाज" माझा नाहीच असे सांगितल्याने ही रेकॉर्डिंग "फॉरेन्सिक लॅब" मध्ये आवाजाच्या पडताळणीसाठी पाठविण्यात आली होती.

   गेल्याच महिन्यात लॅब मधून ह्या आवाजा बाबत अहवाल अकोला एसीबीला प्राप्त झाला असून हा "आवाज" लाच मागणी करणारा विजय चव्हाण याचाच असल्याचे सिद्ध झाले.


    सदरहू अहवालाच्या आधारे अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उरळ पोलिस स्टेशनला २०१९ साली लाचेची मागणी केल्याबद्दल विजय चव्हाण याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अप. क्र. ९१/२०२५ कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.मात्र विजय चव्हाणला आधीच याची भनक लागली असल्याने तो अकोल्यातून फरार झाला आहे.आज अकोला कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या