मलकापूर अकोल्यातील ओमप्रकाश मंत्री यांच्या तक्रारीवरून नवल द्वारकादास मानधने व पवन द्वारकादास मानधने रा.मानधने हॉस्पीटल,स्केटिंग ग्राउंडच्या समोर,गोरक्षण रोड,ता जि.अकोला यांच्याविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात "अवैध सावकारी"चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचेकडे ओमप्रकाश मंत्री यांनी केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने सदर प्रकरणांत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम १६ अन्वये उपनिबंधक सहकारी सस्था, अकोला यांचेकडून पथक गठीत करण्या संबंधाने कार्यवाही करण्यात येवून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला यांचे आदेशाने १) डॉ.नवल द्वारकादास मानधने व २) पवन द्वारकादास मानधने यांचे गोरक्षण रोडवरील दुकानात व निवासस्थानी झाडाझडतीची कार्यवाही करीत कागदपत्रांचा शोध घेण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.या झडतीदरम्यान अवैध सावकारी सिद्ध करणारी बरीच कागदपत्रे आढळून आल्याने त्याची चौकशी करण्यात आली.
उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी प्रकरणातील गैर अर्जदारांना नोटीस देऊन आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देऊन
त्यानुसार सदर प्रकरणाची चौकशी केली.सदरची चौकशी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ में कलम १६ अन्वये करण्यात आली असता प्राप्त अहवालानुसार अर्जदार व गैरअर्जदार यांचेमधील व्यवहार हा सावकारी व्यवहार असल्याबाबत अभिप्राय देण्यात आला असून सदर प्रकरणातील गैरअर्जदार (१) डॉ.नवल द्वारकादास मानधने (२) पवन द्वारकादास मानधने, दोघेही रा. मानधने हॉस्पीटल,स्केटींग ग्राऊंड गोरक्षण संस्थान समोर, गोरक्षण रोड अकोला यांच्याविरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम ३९ अन्वये अकोल्यातील खदान पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक २७१/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




0 टिप्पण्या