अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनला गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेला आणि गेल्या वर्षभरापूर्वी तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे याचा "राईट हॅण्ड" म्हणून "कुप्रसिद्ध" झालेला विजय चव्हाण याआधी बऱ्याच प्रकरणां मधून "सहिसलामत" वाचला परंतु अखेर आज तो एसीबीच्या तावडीत "अडकला"च आहे."हातभार छाती" काढून फिरणारा हा विजय चव्हाण उर्फ "चंगू" अकोल्यातून फरार झाला असून एसीबीचे अधिकारी त्याचा "पाठलाग" करीत असून आज नाहीतर उद्या त्याची रवानगी पोलिस कोठडीत होणारच आहे.
सन २०१९ मध्ये अकोला जिल्ह्यातील उरल पोलिस स्टेशनला कार्यरत असताना त्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला दरमहा २० हजार रुपयांची लाच मागणी ह्या विजय चव्हान याने केली होती. त्याबाबत अकोला एसीबीकडे दिनांक ४/१२/२०१९ ला तक्रार प्राप्त झाली असता दिनांक ८/१२/२०१९ ला त्याची पडताळणी करण्यात आली होती.परंतु त्याला एसीबीच्या "सापळ्या"ची कुणकुण लागल्याने त्याने ही रक्कम स्वीकारली नाही.त्यामुळे अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्याच्यावर लाच मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असता त्याने "रेकॉर्डिंग" मधील "आवाज" माझा नाहीच असे सांगितल्याने ही रेकॉर्डिंग "फॉरेन्सिक लॅब" मध्ये आवाजाच्या पडताळणी साठी पाठविण्यात आली होती.
गेल्याच महिन्यात लॅब मधून ह्या आवाजा बाबत अहवाल अकोला एसीबीला प्राप्त झाला असून हा "आवाज" लाच मागणी करणारा विजय चव्हाण याचाच असल्याचे सिद्ध झाले आहे.
सदरहू अहवालाच्या आधारे अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उरल पोलिस स्टेशनला २०१९ साली लाचेची मागणी केल्याबद्दल विजय चव्हाण याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अप. क्रमांक ९१/२०२५ कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.मात्र विजय चव्हाणला आधीच याची भनक लागली असल्याने तो अकोल्यातून फरार झाला आहे.



0 टिप्पण्या