अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनच्या "चंगू मंगू"च्या जोडीतील चंगू दोन दिवसांपासून "फरार" झाला असून मंगुला मात्र चांगलाच "थरार" सुटला आहे. "दो जिस्म मगर एक जान" असणाऱ्या ह्या जोडीची केवळ खदान पोलिस स्टेशनचा एरियाच नव्हे तर पूर्ण अकोला शहरात "दहशत" पसरलेली आहे.मात्र "चंगू"च्या फरार होण्याने ह्या जोडीची दहशत पार उतरली असून "मंगू"ला शहरात फिरणेही मुश्किल झाले आहे.
ज्या ठिकाणी काम करायचे त्याच ठिकाणी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या "मांडीत पाचर ठोकून" मजा पहायची व त्यांच्या ह्याच "कमजोरी"चा फायदा घ्यायचा अशी ह्या जोडीची "जुनीच सवय" व कामाची पद्धत आहे.गेल्या वर्षी एका अधिकाऱ्याच्या "बुडखा"त अश्याच पद्धतीने "खूटी मारून" त्याला "कुत्र्यासारखे" ह्याच जोडीने फिरायला लावले होते.हे तो अधिकारी आणि सोबत काम करणारे कर्मचारी अजूनही विसरलेले नाहीत, तर तो अधिकारी "अखेर रिटायर्ड" झाला तरी सुद्धा ह्यांनी "ठोकलेली खूटी" तो बाहेर काढू शकलेला नाही.ही खूटी काढण्याचे त्याने खूप प्रयत्न करून पाहिलेत मात्र जेव्हढे तो काढायचा प्रयत्न करीत आहे तेव्हढी ती आणखी "आत जाऊन" त्रास देत असल्याचे चित्र आहे.
महत्प्रयासाने त्याने एक खूटी कशीबशी नातेवाईक व मित्रांच्या सहकार्याने बाहेर काढली मात्र तेव्हढ्याच "स्पीड"ने आणखी दुसरी आतमध्ये जाऊन बसली आहे,तर ज्यांनी ज्यांनी त्याची ही "अडकलेली खूटी" बाहेर काढण्यासाठी मदत केली त्याच पैसे घेवून सहकार्य करणाऱ्या "अधिकाऱ्याच्या मांडी"त देखील दुसरी खूटी अडकली आहे.गेल्या काही दिवसांपासून तो वरिष्ठ अधिकारी जेव्हढी ही खूटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हढी ती आतमध्ये "घुसत" असल्याने तो वरिष्ठ अधिकारी देखील "विचित्र अवस्थे"त सापडला आहे.येत्या २ एप्रिलला त्याची ही खूटी बाहेर निघते की त्या अधिकाऱ्याला "सक्तीच्या विश्रांती"साठी पाठविते हे मात्र आज तरी अनिश्चित आहे.
निरपराध डूकरेचा "गेम" केल्या वरही ह्या जोडीला समाधान न मिळाल्याने त्यांनी आणखी एका निष्पाप अधिकाऱ्याचा "गेम प्लान" बनविला होता,परंतु तो केवळ "नशिबाच्या कृपे"ने वाचला हे त्या अधिकाऱ्याच्या देखील आज चांगलेच लक्षात आले आहे.
बारीक पाचर किंवा खूटी मारून स्वतःचा फायदा करून घेत मजा पहायची सवय जडलेल्या ह्या "जोडीचेच" आता "गेम" व्हायला लागले असून त्यातील एक फरार झाला आहे तर "थोड्याच दिवसां"त दुसऱ्याचा देखील "गेम" ठरलेला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.ह्या "खूटीमार" जोडीमुळे त्रस्त झालेले बरेच "दुःखी आत्मे" आता एकत्र आले असून ते ह्या जोडीचे "जगणे मुश्किल" करून सोडणार असल्याची चर्चा आहे.नेमकी हीच गोष्ट "मंगू"च्या कानावर देखील आली असून त्यामुळे तर तो पुरता हादरला आहे.
एसीबीचे अधिकारी चंगूला अटक करायला यायच्या केवळ दहा मिनिटे आधी ज्या एका "एल.सी.बी."पीआय व्हायची स्वप्ने पाहणाऱ्या. "मतलबी" अधिकाऱ्याने त्याला फरार व्हायला सांगितले तो अधिकारी देखील आता "टार्गेट" झाला असून लवकरच त्याला सुद्धा सापळ्यात जावे लागणार असल्याची "खाकीच्या वर्तुळात" चांगलीच चर्चा रंगली आहे,तर मंगू देखील लवकरच "चंगूच्या सोबती"ला जाणार असल्याची "कुजबुज" आहे.एकंदरीतच "चंगू मंगू"ची दहशत संपुष्टात आल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गात सध्यातरी समाधान व्यक्त केल्या जात आहे.





0 टिप्पण्या