आयपीएस सुधाकर पाठारे ह्यांचे अपघाती निधन...



   हैदराबादला प्रशिक्षणासाठी गेलेले राज्य पोलिस दलातील सुधाकर पाठारे यांचे तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरन्यूल कडे जात असताना अपघाती निधन झाले आहे. 



   तिरुपती येथे मित्रासह देवदर्शना साठी गेले असता पठारे यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला आहे. हे दोघेही ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत अगदी समोरासमोर धडक झाली आणि हा अपघात झाला. 

   सुधाकर पठारे हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून पठारे यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. आयपीएस सुधाकर पठारे हे सध्या मुंबई पोलिस दलात पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या