जालन्यातील आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवणारे रॅकेट उद्वस्त,सचिन जैनसह ५ सट्टेबाज ताब्यात...



    दि.२२/३/२०२५ पासुन आयपीएल क्रिकेटचे सामने सुरु झालेले असुन या सामन्या दरम्यान सट्टा लावुन जुगार खेळणारे लोकांवर पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक, जालना यांनी लक्ष ठेवुन आय.पी.एल.चे क्रिकेट सट्टा बुक्की यांचेविरुद्ध तांत्रिक विश्लेषणाचे आधाराने शोधमोहीम हाती घेवुन त्यांचेविरुध्द कारवाई करण्यासाठी मोहीम उघडली होती.जालना जिल्ह्यात चालत असलेल्या आयपीएल या सट्टा प्रकारावर स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांनी गेल्याच आठवड्यात विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.

   जालना पोलिस ह्याच प्रकरणातील आरोपींचा माग काढत असतानाच मागील दोन तीन दिवसापासुन गुप्त बातमीदार यांचे खात्रीलायक बातमीवरुन तसेच करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन काही किक्रेट मॅच बुक्की हे हिंगोली येथे ठिय्या ठोकून किक्रेट मॅचवर सट्टा लावुन जुगार खेळ खेळत व खेळवित असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक जालना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग जालना यांचे मार्गदर्शनात जालना शहरात जुगार खेळणारे यांचे मागावर होते. पोलीस ठाणे चंदनझिरा हद्दीत पोउपनि, एम.बी. स्कॉट यांचे एक पथक नेमण्यात आले होते. पोलीस ठाणे चंदनझिरा येथील एक पथक पोउपनि.सचीन सानप यांचेसह हिंगोली शहरात बसुन क्रिकेट सट्टा खेळविणारे बुक्की यांचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते.

    गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना काल दि.२८/३/२०२५ रोजी यश आले. मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीवरुन ठाणेदार व पथकातील पोउपनि. स्कॉट यांचे पथकाने चंदनझिरा भागात एका इसमास चेन्नई सुपरकिंग्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचे क्रिकेट मॅचचे दरम्यान सट्टा बुक्की गोविंद गुप्ता याचेकडे सट्टा खेळत असतांना मिळुन आल्याने शे.मुस्तकीन शे. वजीर,वय ३४ वर्ष रा.कुंभारगल्ली, पाणीवेस जालना यास पकडले.त्याने सट्टा बुक्की गोविंद गुप्ता व त्याचे इतर साथीदार बुक्की यांचेकडे सट्टा खेळल्याची कबुली दिली.

   त्यावरुन तात्काळ हिंगोली शहरात त्यांचे मागावर असलेले पथक पोउपनि.सचीन सानप यांना कळविण्यात आल्याने त्यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधाराने शोध घेतलेले सट्टा बुक्की नामे १) गोविंद ऊर्फ अश्विन विरेंद्र गुप्ता रा.काद्राबाद जालना व त्याचे साथीदार बुक्की नामे २) सचीन विजयराज जैन रा.महिको कॉलनी, जालना (बुकी) ३) विशाल राजेंद्र बनकर रा. सकलेचानगर, जालना (बुकी) ४) संतोष नामदेव लहाने रा.तांदुळवाडी ता.जि. जालना (बुकी) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण ८,५३,००० रुपयांचा लॅपटॉप,महागडे मोबाईल व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

    सदरची कामगीरी अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक,आयुष नोपाणी,अपर पोलीस अधीक्षक, जालना,विशाल खांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग जालना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चंदनझिरा पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत, पोउपनि सचीन सानप, पोउपनि. एम.बी.स्कॉट यांचेसह पथकातील अंमलदार प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे,संतोष वनवे,साई पवार,शिवाजी जमधडे, रविंद्र देशमुख,राजु पवार, अभिजित वायकोस, सागर खैरे आणि सागर बाविस्कर,तांत्रीक विश्लेषण,स्थागुशा यांनी केली आहे.

    सदर सट्टा बुकी यांनी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेवुन त्या मार्गाने त्यांनी जमवलेल्या संपत्ती बाबत माहिती घेवुन त्या संपत्तीचे जप्तीबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असुन पकडण्यात आलेल्या सट्टा बुकीचे गुन्हे अभिलेख तपासुन त्यांनी पुन्हा आयपीएल क्रिकेट सट्टेबाजी करु नये म्हणून त्यांचेवर अपर पोलीस अधीक्षक,जालना यांचेकडे हजर करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या