जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे अखेर एसीबीच्या जाळ्यात अडकलीच...



   महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य असून या राज्याची वाटचाल ही इतर राज्यांच्या तुलनेत नेहमीच पहिल्या क्रमांकाची असते.स्त्री पुरुष समानतेच्या युगात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला असून या राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील महिला नेहमीच पुरुषांपेक्षा सरस कामगिरी बजावतात. जशा प्रगतीच्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने नाही तर नेहमीच पुढे राहतात तशाच आतातर भ्रष्टाचाराच्या क्षेत्रात सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्यांच्या चार पावले पुढेच ह्या महिला आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमध्ये देखील राज्यातील महिला आघाडीवरच असल्याचे दिसून येत आहे.

     राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबी म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, पोलीस,वन, महसूल विभागासह विविध शासकीय विभागातील अधिका-यांचा उल्लेख आहे. त्यात, महिला अधिकारी, कर्मचारीही आहेत. आता, परभणी जिल्ह्यातील एसीबीकडून देखील केवळ मोठीच नव्हे तर भक्कम कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात नेहमीच वादग्रस्त असणारी व राहिलेली जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे अखेर एसीबीच्या जाळ्यात अडकलीच आहे. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदेने अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील,दीड लाखांची लाच घेताना ह्या महिला अधिकाऱ्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे.


     परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात या  लाचप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेकडून लाच मागण्यात आली होती. कविता मॅडमनी या मंजुरीसाठी संबंधितांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती, ज्यात दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिका-यांनी रंगेहात पकडले आहे. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


     मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबाला पेन्शनसाठी मागितलेले पैसे असो की, क्रीडा कर्मचा-यालाही क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी मागितलेली पैसे असो,अशा अनेक आर्थिक गैर व्यवहाराचे आरोप सतत होतच असतात.त्यातच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील आमदारांनी लावलेली लक्षवेधी चर्चेत असतानाच परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेला तब्बल दीड लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात पकडले आहे. मानवट येथील एका तक्रारदाराला येथील क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्विमिंग पूलाला
मान्यता देण्यासाठी कविता नावंदेने अडीच लाखांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये आधीच देण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित राहिलेली ही रक्कम तक्रारदाराला त्यांना द्यायची नव्हती. त्यामुळे या तक्रारदाराने परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्या अनुषंगाने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि सापळा रचून दीड लाख रुपये स्वीकारताना कविता नावंदेला रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून स्थानिक पोलिस ठाण्यात ह्या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

   दरम्यान, कविता नावंदेवर यापूर्वीही गैरव्यवहारांचे अनेक आरोप करण्यात आले होते. तर, नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना तही जिल्ह्यातील दोन आमदारांनी त्यांच्या कारभाराबद्दल विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यातच, एसीबीच्या अधिका-यांनी सापळा टाकून जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर असलेल्या ह्या वादग्रस्त महिला अधिकाऱ्याला तब्बल  १.५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या