अकोट महसूल विभागातील नव्यानेच बदलून आलेला एक "अष्टगंधधारी" मंडळ अधिकारी फारच "अफलातून" असून त्याचे काही "कारनामे" या आधीच आम्ही जनता जनार्दनासमोर "चव्हाट्या"वर मांडले आहेतच.त्याने सरळ सरळ असलेले सर्वसामान्य लोकांचे तलाठ्यांनी घेतलेले "फेरफार रद्द" करून आपल्या "अकलेचे दिवाळे" निघाले असल्याचे "पुरावे" या आधीच दिले असून अकोटच्या एसडीओ यांनी देखील त्यावर "शिक्कामोर्तब" देखील केले आहे.
आता त्याने केलेला एक "फार मोठा प्रताप" विद्रोही मराठाच्या हाती लागला असून ह्या मंडळ अधिकारी असलेल्या "बंडल" माणसाने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा वा तलाठी वर्गावर असलेल्या "नाराजी"ने म्हणा तलाठ्यांनी एकदा घेतलेला फेरफार रद्द करून पुन्हा "तोच फेरफार" घेण्यासाठी तलाठ्याला पत्र देऊन आपल्या "अकलेचे दिवाळे" निघाले असल्याचे दाखवून दिले आहे.वास्तविक पाहता एकदा घेतलेला फेरफार मंडळ अधिकाऱ्याने रद्द केल्यावर तो फेरफार पुन्हा तलाठी वा मंडळ अधिकाऱ्याला नियमानुसार घेताच येत नाही.तो मंजूर करणे तर फार दूरची गोष्ट आहे.परंतु ह्या गणेश भारती नामक मंडळ अधिकाऱ्याने तलाठ्याने एकदा घेतलेला फेरफार रद्द करून काही दिवसांनी त्याच तलाठ्याला कार्यालयीन पत्र देवून पुन्हा तोच फेरफार घ्यायला सांगितले आहे.असे करणे म्हणजे एसडीओ यांचे "अधिकार क्षेत्रात ढवळा ढवळ" करणे आणि त्यांचे अधिकार वापरणे आहे.इतकेच नव्हे तर असे काही करणे म्हणजे तो सरळ सरळ "चारशे विशी"चा गुन्हा ठरतो.त्याबद्दल लक्षात आल्यास संबंधित एसडीओ अशा व्यक्तीवर पोलिसात गुन्हा देखील दाखल करू शकतात,ही वास्तविकता आहे.
मात्र "मी कुणालाही घाबरत नाही" असे अगदी "छातीठोक"पणे सांगणाऱ्या गणेश भारती नामक मंडळ अधिकाऱ्याला कुणी समजावून सांगण्याची हिंमतच करू शकत नाही.संबंधित तलाठी स्पष्टपणे त्याने सांगितलेल्या ह्या गोष्टीला एक तर नाही म्हणूच शकत नाही,कारण वरिष्ट अधिकाऱ्यांच्या कानात जर काही वेगळेच सांगितल्या गेले
तर विनाकारण "निलंबना"ला सामोरे जावे लागू शकते याची त्यांना "खात्री" आहे.
अकोट शहरातील रहिवाशी असलेले संतोष हरिप्रसाद झुनझुनवाला यांनी तलाठी सज्जा भाग २ मध्ये खरेदीखताने खरेदी केलेल्या २ भूखंडांच्या नोंदीसाठी अर्ज सादर केले होते. तलाठी यांनी ते रीतसर असल्यामुळे ह्या नोंदी रेकॉर्डवर घेऊन संबंधितांचा फेरफार नोंदवून घेतला आणि तो पुढील मंजुरीसाठी मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्याकडे पाठविला होता.मात्र ह्या मंडळ अधिकाऱ्यांनी हा फेरफार मंजूर न करता तो नामंजूर करीत त्याच तलाठ्याची चांगलीच "ऑन रेकॉर्ड" कान उघाडणी देखील केली होती.
संबंधित अर्जदाराचे अर्जावर फेरफार नोंदवून ते नंतर नामंजूर करण्यात आले आहेत मात्र त्याच शेत सर्वे क्रमांक ४५ मधील इतर काही लोकांचे म्हणजेच ५० लोकांचे फेरफार मात्र बिनदिक्कत नोंदवून घेण्यात येवून मंजूर करण्यात आलेले आहेत.तर किमान २५ अर्जदारांचे फेरफार नामंजूर करण्यात आलेले आहेत.ही सगळी "हेराफेरी" काय आहे.? आणि कशासाठी.? हे मात्र अजूनही कुणाच्याच लक्षात आलेले नाही ही फार मोठी "शोकांतिका" आहे.
आधी रद्द केलेला फेरफार पुन्हा घेण्यासाठी ह्याच मंडळ अधिकाऱ्याने त्या तलाठ्याला कार्यालयीन पत्र दिले असून यात हा "रद्द केलेला" फेरफार पुन्हा नोंदविण्याचे स्पष्टपणे "आदेशच बजावले" आहेत.परंतु ह्यातील "खरी गोम" अशी आहे की,एकदा हा "फेरफार रद्द केल्या"वर त्या तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याला तो पुन्हा घेताच येत नाही. त्यासाठी त्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी,एसडीओ यांचेकडे संबंधित अर्जदाराला "अपील दाखल" करावे लागते. त्यानंतरच तो फेरफार पुन्हा घेण्यासाठी ते एसडीओ संबंधित तलाठ्याला आणि मंडळ अधिकाऱ्याला "फेरफार नोंदविण्या साठी आदेश" करतात.अशी ही "लांब पल्ल्याची प्रोसीजर" आहे. तुम्हीही हे पत्र वाचा आणि अकोट महसूल विभागात काय आणि कसे चालले हे पाहून घ्या.
अकोटच्या महसूल विभागातीलच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालया तील काही कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा ह्या मंडळ अधिकाऱ्याच्या "पाठीशी असल्यानेच" कुणीही त्याचे "केस ही वाकडे करू शकत नाही." असे ह्याच विभागातील काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून आम्हाला तरी त्यात काही अंशी नव्हे तर पूर्णतः सहमत व्हावेच लागते.त्याला कारणेही तशीच आहेत.या आधीही आम्ही ह्या मंडळ अधिकाऱ्याचे एक दोन नव्हे तर बरेच "कारनामे" उघड केलेले आहेत परंतु प्रत्येक वेळी स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी घालून त्याच्या "चुकांवर पांघरुण"च घातलेले आहे."अनुभव खूप वाईट" आहेत.आता "भीती वाटते",ती ह्या संबंधित अधिकाऱ्याची नाही, तर त्याच्या "पाठीशी असणाऱ्या" अधिकारी व कर्मचाऱ्यांची.कारण कोण.? कधी.? कोणता "खोटा गुन्हा" दाखल करेल,याची काहीच शाश्वती देता येत नाही."सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपली त्यातही तयारी आहेच.करा किती आणि कुठे कुठे करता".







0 टिप्पण्या