दोन्ही मुले माझीच,परंतु त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही,खावटी न देण्यासाठी मुंढे यांचे बहाणे...



    दोन्ही मुले माझीच आहेत पण त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही, करुणा शर्मा मुंढे यांना "खावटी" द्यावी लागू नये म्हणून धनंजय मुंडेंच्या वकिलांनी हा युक्तिवाद कोर्टात केला असल्याचे बोलल्या जात आहे.


    धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देत कोर्टात युक्तिवाद केला. त्यांनी मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृतरित्या लग्न केलेले नाही, असा दावा केला आहे. मुलांना आर्थिक मदत करण्याची तयारी असल्याचे सांगितले तर, करुणा मुंडे शर्मा ह्या स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचेही नमूद करण्यात आले.

    राज्याच्या सरकार मधून काढण्यात आलेले राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन  लाखांची पोटगीची रक्कम देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशा विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरू असून करुणा मुंडे यांना पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याच धनंजय मुंढे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरू आहे. पोटगीची रक्कम फारच कमी असून ती ९ लाख रुपये करण्यात यावी,अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.


     करुणा मुंडे यांना पोटगी मिळण्याप्रकरणी युक्तीवाद आता अंतिम टप्प्यात सुरु असून धनंजय मुंडे यांच्या वतीने "मी मुलांना स्वीकारत आहे,पण मी त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही", असा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही,असा दावाही केला.

   राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा मुंढे सोबत झालेले लग्न अधिकृत नाही.करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत.त्यांना माझ्या पैशांची गरज नाही.त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहेत. करुणा मुंडे या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत,असेही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या