राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला असून करुणा शर्मा ह्या धनंजय मुंडे यांच्याच पत्नी असल्याचा निर्वाळा दिला आहे.
करुणा शर्मा ह्या धनंजय मुंडे यांच्याच पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे.सोबतच करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रूपये पोटगी देण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिले आहेत. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने हा निकाल दिला असून धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचा निर्वाळाही कोर्टाने दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे चांगलेच वादात अडकले आहेत तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामील असलेल्या आरोपीशी असलेल्या संबंधावरून मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकां कडून मागणी होत आहे.त्यानंतर आता करुणा शर्मा यांच्या याचिकेवर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने निकाल दिला आहे.



0 टिप्पण्या