अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून तहसीलदार यांनी बांगला देशी नागरिकांना चुकीच्या पद्धतीने जन्म दाखले देण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकतेच करून संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती.त्यासाठी राज्य शासनाने एका विशेष एसआय टीचीही स्थापना याची चौकशी करण्याकरिता करण्यात आली होती.
याच बाबतीत दोषी व जबाबदार व्यक्तींच्या विरोधात अंजनगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करून एफआयआर नोंदविण्यासाठी हेच किरीट सोमय्या उद्या गुरुवार दि.६/२/२०२५ ला येत असल्याची माहिती आहे.
यासाठी सोमय्या यांनी स्वतः पोलीस निरीक्षक,अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन,यांना पत्र लिहून, बांग्लादेशी रोहिंग्यांना देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र घोटाळा करण्यात आला होता.नोव्हेंबर २०२३ मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांना मिळाले. सन २०२४ मध्ये प्रत्यक्षात उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याची सुरुवात तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या द्वारा झाली. अंजनगाव सुर्जी (अमरावती) तहसीलदार कार्यालयात सन २०२४ मध्ये सुमारे १,४८४ अर्ज आले. त्या अजपैिकी एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही.
यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अपात्र, बांग्लादेशी लोकांना भ्रष्टरित्या, बेकायदेशीर पद्धतीने जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यासंदर्भात पुराव्यांसह तक्रार करण्यासाठी ते स्वतः गुरुवार दि.६ फेब्रुवारी रोजी स.९:०० वा. अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे येणार असल्याचे किरीट सोमया यांनी सांगितले आहे.
आता किरीट सोमय्या हे नेमके कुणाच्या विरुद्ध तक्रार देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.हे सर्व दाखले अंजनगावच्या तहसीलदार पुष्पा सोळंके (डाबेराव) यांच्या सहीने देण्यात आलेले आहेत.त्यामुळे ह्यात त्यांनाच जबाबदार धरण्यात येवून त्यांच्याच विरुद्ध ही तक्रार होणार असल्याची ही चर्चा आहे.ज्या व्यक्तीचे हे प्रमाणपत्र आहे अर्थात त्याच्याही विरुद्ध फौजदारी कारवाई होईल हे निश्चित.
याबाबत गेल्याच आठवड्यात आम्ही पुष्पा सोळंके ह्यांना निलंबित करणार असल्याचे सांगितले होते.त्याबाबत एसआयटीचा अंतरिम अहवाल येणार असल्याचेही म्हटले होते.आता येत्या २४ तासांत ह्या बाबतीत निश्चित कुणावर कारवाई होते हे समोर येणारच आहे. तहसीलदार ह्यांना जबाबदार धरून तशी तक्रार झाल्यास एफआयआर नुसार तहसीलदार पुष्पा सोळंके ह्यांचेवर गुन्ह्याची नोंद झाल्यास त्यांचे निलंबन मात्र नक्की आहे.





0 टिप्पण्या