राज्यातील सर्वसामान्य जनतेची कामे सुलभतेने पार पाडण्यासाठी राज्य सरकार लवकरच १ लाख ९४ हजार विशेष कार्य अधिकारी (SEO) यांची मेगा भरती ( नियुक्ती ) करणार आहे. महसूल मंत्री आणि विशेष कार्य अधिकारी निवड समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही आज घोषणा केली आहे.
जिल्हा व मतदारसंघातील भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या कामासाठी मंत्रालयात समन्वयक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील प्रत्येक ५०० मतदारांमागे एक एसईओ नियुक्त केला जाणार आहे.ज्यामध्ये भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.यासाठी एकच निकष ठेवण्यात आला आहे की २५ वर्षांवरील आणि ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींची नियुक्ती केली जाईल.
महिलांसाठी ३३ टक्के जागा - विशेष कार्य अधिकारी...
बावनकुळे यांनीही महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्याची माहिती दिली आहे. यापूर्वीही अशा नियुक्त्या झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने सोमवारी सुधारित आदेश जारी केला आहे. राज्यस्तरावरील निवडीसाठी ते अध्यक्ष आहेत. पालकमंत्री सदस्य तर जिल्हा दंडाधिकारी सदस्य सचिव असतील.
१४ प्रकारचे अधिकार
विशेष कर्तव्य अधिकाऱ्यांना १४ प्रकारचे अधिकार मिळतील. आतापर्यंत दर हजार मतदारांमागे एक कार्य अधिकारी आहे.आता प्रत्येक ५०० मतदारांमागे एक अधिकारी असणार आहे.जिल्ह्याच्या निवड समितीच्या माध्यमातून लवकरच नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विकास समस्या, कार्यक्षमता समिती इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर SEO काम करेल. एसइओ हे सरकारच्या विविध योजनांमध्येही मदत करतील आणि प्रशासन आणि पोलिस यांच्यात समन्वय साधतील.शासकीय योजनांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणार.
सर्वसामान्यांना काम उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणार असून त्यांना विविध समित्यांमध्ये संधी दिली जाणार आहे. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ असेल.SEO चा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. त्यांना ग्रामसभेलाही बोलावता येईल. राज्य सरकारकडून पुरस्कार मिळालेल्या पाच मान्यवरांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. नव्या नियुक्तीमुळे शासकीय सेवा आणि सुविधांसाठी आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध होतील,असा दावा केला जात होता.




0 टिप्पण्या