३५ वी अमरावती परिक्षेत्रीय पोलीस किडा स्पर्धा २०२४ चे आयोजन दि.१५.१२.२०२४ ते दि.२०.१२.२०२४ या कालावधीमध्ये अमरावती येथे करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये विभागातील अकोला,अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम, या घटकांचा सामावेश होता.
दि.२०/१२/२०२४ रोजी जोग स्टेडीयम अमरावती येथे समारोपीय कार्यक्रम पार पडला.विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे तसेच नवीचंद रेड्डी पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सांधीक खेळामध्ये अकोला पोलीस दलाने उत्कृष्ट कामगीरी करत दुसरा क्रमांक पटविला आहे.
सांघीक खेळामध्ये बास्केटबॉल पुरुष व महीला गोल्ड,हॉकी पुरूष सिल्वर,फुटबॉल पुरूप सिल्वर, कबडडी महीला व पुरुष सिल्वर, खोखो महीला सिल्वर,व्हॉली बॉल महीला सिल्वर, व्हॉली बॉल पुरूप ब्रॉश, हॅन्डबॉल पुरुष ब्राँझ,यांनी उलेखनिय कामगीरी करत अकोला पोलीस दलाची कौतुकास्पद छाप उमटवली.त्यामध्ये अकोला पोलीस दलातील १७० खेडाळूनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये पोकॉ.बनं १४११ साहिल मुलानी यांनी बेस्ट अॅथेलेटीक्सचा मान मिळवून भालाफेक या स्पर्धे मध्ये ५२ मीटर भाला फेकून विजेत पद पटकविले. त्याच प्रमाणे अॅथेटिक्स मध्ये पो.का.पुरूषोत्तम खोडे यांनी १५०० मी. गोल्ड व ८०० मी सिल्वर, ५०००मी. अंकुश दामोधर गोल्ड, ३००० मी. सागर सोळंके सिल्वर, १००००मी. वरद जोशी ब्रॉस, ११० मी. हरडल अच्यूत वानखडे ब्राँझ, ४००मी हरडल शिवप्रसाद कांगणे गोल्ड, उंच उडी इद्यानशा गोल्ड, तिहेरी उडी स्वप्नील तायडे ब्रॉन्स, थालीफेक अनूप हातोलकर गोल्ड, विजय तायडे ब्रॉन्स, रिले ४४१०० संतोष दाभाडे, इमानशा, गौरव खंडारे, वैभव बंड, सिल्वर, २०० मी रविंग महीला मोनाली खेवले गोल्ड १००मी, मध्ये ब्रॉज, ४००मी. प्राची वंजारी गोल्ड, १००मी.हरडल प्रीयंका पिंजरकर सिल्वर, उंच उडी महीला मनिषा इंगळे सिल्वर, मिताली राउत ब्रॉज, गोळा फेक महीला वैष्णवी कदम गोल्ड, भालाफेक वैष्णवी वाणी गोल्ड,४१०० रिले महीला नेहा खान, मोनाली खेवले, प्राची वंजारी, प्रियंका पिंजरकर, सिल्वर, ४४४०० नेहा खान, मोनाली खेवले, प्राची वंजारी, कोमल ढोले सिल्वर मेडल पटकाविले. क्रॉस कंट्री १० किमी. सिल्वर मेडल सागर सोळंकी, पुरुषोत्तम खुडे, शिवप्रसाद कांगणे, वरद जोशी, अंकुश दामोधर, गजानन ठाकरे, स्वप्नील तायडे, यांनी पटकावीले. स्वीमींग ५०मी. व १००मी. बैंक स्ट्रोक पोका महेश धांडे बंन ६८७ यांनी गोल्ड व ५०मी व १००मी. ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये गोल्ड मेडल पटकाविले. ५०मी. ब्रेस्ट स्ट्रोक रोशन बडे सिल्वर, ४४१०० जलतरण मीड्ले रिले महेश धांडे रोशन यडे, प्रफुल बांगर यांना ब्रॉज मेडल मिळवले. कुस्ती पुरुष मध्ये पवन नंदुलाल यादव ७४ कीलो वजन गटात गोल्ड मेडल, ८९ किलो सतिश पवार गोल्ड, शक्ती कांबळे ९७ कीलो वजन गटात गोल्ड मेडल, आमीर हफीज ७०कीलो वजन गटात गोल्ड, महिाला कुरती मध्ये ६२ किलो यात मनिषा इंगळे व प्रिया शेगोकार यांनी सिल्वर मेडल, तायकांडो महिला रूपाली मानकर आणि तायकांडो पुरुष मध्ये सागर सोळंके, वैभव बंड, सचिन पाटिल यांनी गोल्ड मेडल, वृ शु पुरूष पोका सागर सोळंके, सचिन पाटील, पोका गौरव डाबेराव यानी गोल्ड मेडल, बॉडी बील्डींग मध्ये सुयश जडीये व उमेश भाकरे यांनी गोल्ड मेडल, बॉक्सिंग मध्ये इम्रानशा आणि जुगल इंवलकर यांगी गोल्ड तसचे ज्युडो मध्ये पो कॉ सतिष पवार, पोकों. शक्ती कांबळे, यांनी सिल्वर मेडल पटकाविले.
सांघीक व वैयक्तिक खेळात एकुण १९७ मेडल मिळवित लक्षणीय छाप अकोला पोलीस दलाने उमटविली. सदर क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परि.पो.उपअधीक्षक किरण भोंडवे,राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके तसेच खेळ प्रशिक्षक पो.हवा.रवि ठाकुर यानी मेहनत घेतली.
असे एका प्रसिद्धिपत्रका द्वारे शंकर शेळके,पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी अकोला पोलीस दल यांनी कळविले आहे.



0 टिप्पण्या