अकोट व अकोला शहरावर पोलिसांच्या "तिसऱ्या डोळ्या"ची नजर...



    अकोला जिल्हयात ४ उपविभाग व २३ पोलीस स्टेशन असुन एकुण ७ तालुक्यामध्ये जिल्हा विभागला गेला आहे.अकोला जिल्हयास एकुण तिन जिल्हयांच्या सिमा लागून आहेत. त्यामध्ये पश्चीमेस - बुलढाणा उत्तर व पुर्व अमरावती तर दक्षीणेस वाशिम जिल्हा आहे. अकोला जिल्हयामधुन महत्वाचे महामार्ग मुंबई ते नागपुर, कलकत्ता व दक्षिणेच्या राज्यातून थेट मध्यप्रदेशात जात असल्याने जिल्हयात व शहरात वाहतुकीची मोठी वर्दळ नेहमीच सुरू राहते, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी व "हिट ॲण्ड रन"चे गुन्हे उघडकिस आणण्याच्या दृष्टीने प्रभावी "सिसीटीव्ही"ची यंत्रणा असणे गरजेचे होते.


   अकोला शहरात रेल्वे जंक्शन असल्याने तसेच अकोला वासीयां कडुन प्रवासासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसेसचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रवाशांच्या व त्यांच्या सामानाच्या सुरक्षेतेसाठी प्रभावी सिसीटीव्हीची यंत्रणा असणे गरजेचे होते. तसेच उत्सवप्रिय अकोला व अकोट शहरामध्ये गणपती विसर्जन, श्रावण महिन्यात कावड यात्रा व ईद मिरवणुक हे मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने साजरे केले जातात. सर्व धर्मिय सण सुरक्षीतपणे साजरे करण्यासाठी प्रभावी सिसीटीव्हीची यंत्रणा असणेही त्यादृष्टीने आवश्यक ठरते. 

     त्याचप्रमाणे परराज्य व पर जिल्हयातुन येणारे विविध गुन्ह्यातील गुन्हेगार यांच्यावर वचक ठेवण्यासाठी तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विविध सरकारी कार्यालयातील वर्दळींचे ठिकाणी प्रभावी सिसीटीव्हीची यंत्रणा असणे हे पोलिसांच्या तपासाच्या व जिल्ह्यातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक होते. 


    अकोला शहर हे शिक्षणाची व विविध क्लासेसची पंढरी म्हणुन ओळखल्या जात असल्याने अकोला शहरात बऱ्याच दूरच्या जिल्हयातील ज्ञानार्जना साठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी सिसीटीव्हीची यंत्रणा ही मोलाची ठरते.अकोला शहर सामाजिक दृष्टया संवेदनशिल असल्याने अकोला शहरांत व अकोट शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडविणा-या समाज कंटकांवर वचक ठेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी दोन्ही शहरास सिसिटिव्हींचे सुरक्षा कवच देणे अत्यंत आवश्यक होते.

   अकोला व अकोट शहर यांची सामाजिक पार्श्वभुमी पाहता दोन्ही शहरामध्ये प्राधान्याने पुरेसे व दर्जेदार सि.सि.टी.व्हि. कॅमेरे असणे अत्यंत गरजेचे वाटल्याणे तात्काळ "जिल्हा नियोजन समिती,अकोला" यांना सि.सि.टि.व्हि. मागणीबाबत सविस्तर अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून पाठविण्यात आला होता तसेच सदर प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक यांनी भक्कम पाठपुरावा केला आणि त्यास यश आले. तात्कालीन पालकमंत्री राधाकृष विखे पाटील यांनी सदर प्रस्ताव मंजुरीसाठी योग्य तो पाठपुरावा करून सदर प्रकल्पास मंजुरी मिळवुन देण्यात मोलाची भूमिका निभावली. 

   या पोलिस विभागाच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करून प्राधान्याने अकोला शहरासाठी ४५ चौकांमध्ये एकुण १९७ सि.सि.टि.व्हि. कॅमेरे तर अकोट शहरासाठी ४० चौकात एकुण १६५ सि.सि.टी.व्हि कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यास तात्काळ मान्यता देण्यात आली असून लवकरच अकोला व अकोट शहरास सि.सि.टि.व्हीचे सुरक्षा कवच प्राप्त होईल.अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, तथा जनसंपर्क अधिकारी,पोलीस अधिक्षक कार्यालय,अकोला यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या