अकोट शहरातील पोपटखेड मार्गावर अतिरिक्त जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालय असून हा परिसर "शांतता क्षेत्र" म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.मात्र असे असतानाही ह्या परिसरात न्यायालय परिसराच्या समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचे कर्न कर्कश हॉर्न व विविध कार्यक्रमांच्या मिरवणुका जात असताना मोठ मोठ्या आवाजात डीजे, लाऊड स्पिकर तसेच वाद्यांच्या गजरात ह्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केल्या जाते.ह्या होत असलेल्या सततच्या "गोंगाटा"ने न्यायालयात चालत असलेले कामकाज विस्कळीत होत असते.हे सगळ्यांनाच खुल्या नजरेने दिसत असूनही गेल्या कित्येक वर्षांत कुणीच ह्या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला नाही वा कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही ही खेदाची बाब आहे. तसेच हे शांतता क्षेत्र असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या परिसरात रस्त्यांवर "स्पीड ब्रेकर" आणि न्यायालय परिसराच्या दोन्ही बाजूला "सायलेन्स झोन" असल्याबाबत पाट्या लावण्याचेही साधे सौजन्य दाखविलेले नाही ही अत्यंत "निर्लज्जपणाची" बाब आहे.
आज दि.२७/११/२०२४ रोजी १२:३० वाजताच्या दरम्यान न्यायालया समोरच्या रस्त्या वरून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे एक लग्राची मिरवणुक वादयासह जात होती त्याच वेळी अति.सत्र न्यायाधिश यांचे दालनात एका महत्त्वाच्या प्रकरणांत साक्षीपुरावा नोंदणे सुरू असतांना ह्या वाद्याच्या गोंगाटाने न्यायालयात सुरू असलेले कामकाज बराच वेळपर्यंत थांबविण्यात आल्याने विस्कळीत झाल्याने वि.न्यायाधीशांनी कोर्ट परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून सदर वादय वाजविणार्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.
कोर्ट पैरविकार पोहेकॉ.गजानन देवकर, ब.नं.३६६ पो.स्टे. अकोट शहर व पोहेकॉ.दिनेश काळे, ब.नं.५२८ व यांनी न्यायालय समोरील रस्त्या वर जावुन पाहणी केली असता मनोहर बैंड पार्टी अकोट यांचे वादय वाजत असल्याचे दिसले. वादय वाजविणा-या इसमांना त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता, त्यांनी त्यांचे नावे १) मनोहर अण्णाजी कासार, वय ६६ वर्ष रा.अण्णाभाऊ साठे नगर,मोठे बारगण अकोट ता.अकोट व २) सुधाकर विश्वनाथ बावणे, वय ६२ वर्ष रा.अण्णाभाऊ साठे नगर,मोठे बारगण अकोट ता.अकोट असे सांगितले. त्या दोन्ही इसमांना वादय वाजविण्याबाबत परवाना मागीतला असता, त्यांनी नसल्याचे संगितले. वरून यातील नमुद मनोहर बैंड पार्टी,अकोटचे मालक यांनी त्यांचे पथकासह न्यायालय परिसरात वादय वाजविण्या बाबत प्रतिबंध असतांना सुध्दा न्यायालयाचे समोरील रस्त्यावर जोर जोरात कर्कश आवाजात वादय वाजवितांना मिळुन आले असता त्यांनी प्रतिबंधीत क्षेत्रात वादय वाजविण्यास मनाई असतांना सुध्दा वादय वाजवुन आदेशाचे उल्लघंन केल्याने दोन्ही नमुद आरोपीतां विरूध्द कलम २२३.३ [५] भा.न्या.सं.नुसार कायदेशीर कारवाई होणेबाबत अकोट शहर पोलिस स्टेशनला लेखी फिर्याद दिली आहे.
सदरहू तक्रारीनुसार अकोट शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची ही कारवाई सुरू असताना परिसरातील नागरिकांची याठिकाणी चांगलीच गर्दी जमा झाली होती,वाद्य वाजविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू असताना काही नागरिकांच्या चर्चेतून असाही सूर निघाला की ही कारवाई केवळ पोटापाण्यासाठी वाद्य वाजविणाऱ्या व्यक्तींवर न होता ती ज्या लोकांसाठी हे वाद्य वाजविण्यात येत होते वा ज्यांनी ह्या बैंड पार्टीला "बुक" केले होते,त्यांच्यावरही असेच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते.मात्र अकोट पोलिसांनी केवळ वाद्य वाजविणाऱ्या लोकांवर कारवाई करून "भेदभाव" केल्याचा आरोप करण्यात येत होता.



1 टिप्पण्या
कोर्ट च्या बाजुला बरेच ठीकाणी मजजीद मध्ये करणकरकश अजाण सुरू असते त्याचे काय 😧😡
उत्तर द्याहटवा