अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार पार ढेपाळला असून याठिकाणी कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांवर कुणाचाच अंकुश राहिला नसल्याचे सर्वसामान्य जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसत असून त्यांनी आपली ही समस्या कुणाकडे मांडावी हीच एक समस्या होऊन बसली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील व त्यांच्याच कार्यालयाला लागूनच असलेल्या या जिल्ह्यातील अतिमहत्वाच्या कार्यालयाला आज ११ वाजले असतानाही कुलूप लागलेले आहे.याठिकाणी कार्यरत असलेले तीन चार पैकी एकही कर्मचारी यांचे कार्यालयात ११ वाजेपर्यंतही आगमन न झाल्याने काल लावण्यात आलेले कुलुप ११ वाजता लागलेच होते.त्यांच्या बाजूलाच निवासी उपजिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यालयात बसून दैनंदिन कामे करीत आहेत परंतु लागूनच असलेल्या गृहविभागाला कुलूप लागलेले आहे याची त्यांना काहीच कल्पना नाही. या गृह विभागाच्या बाबतीत हा प्रकार नेहमीचाच असल्याने हा विभाग तर नेहमीकरिता बंद करण्यात आलेला नाही ना असा आपली कामे घेऊन येणाऱ्यांचा समज होत आहे.
अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार हे या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करतात की त्यांना पाठीशी घालतात हे मात्र एक दोन दिवसांत दिसेलच. जवळपास एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयच नव्हे तर राज्य शासनाच्या सर्वच कार्यालयात हेच प्रकार सुरू असल्याचे सर्वसामान्य लोकांना अनुभव येतात,मात्र वरिष्ठ अधिकारी यांना त्याच्याशी काय देणे घेणे.?




0 टिप्पण्या