अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाने काल दि.२४/२/२०२४ च्या आदेधानुसार आज तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांना यवतमाळ जिल्ह्यात देण्यात आले आहे.
दहीहंडा पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात तीन ठाणेदारांची अशीच उट्टस करण्यात करण्यात आल्याने दहीहंडा हे याठिकाणी येणारया ठाणेदारांसाठी शापित पोलीस ठाणे ठरत असून आता नव्याने येणारे ठाणेदार किती महिने काढतील हे येणारा काळच ठरवेल.
ठाणेदार योगेश वाघमारे हे त्यांच्या कारकिर्दीत अवैध धंदे,देशी दारू व प्रतिबंधित गुटखा बंद न करता उलट त्याला प्रोत्साहन देत असल्याचे वारंवार उघडकीस आल्याने तथा आयपीएस अनमोल मित्तल यांनी टाकलेल्या धाडीवरून सहज लक्षात येत होते.एकंदरीत योगेश वाघमारे यांनी कारकीर्द ही वादग्रस्तच राहिली आहे.
या आधी सुरेंद्र राऊत व सेवानंद वानखडे हे देखील आपली कारकीर्द पूर्ण करू शकले नाहीत.
योगेश रामचंद्र वाघमारे यांच्यासोबतच राहुल समाधान वाघ व सुरेंद्र आत्माराम राऊत यांचीही यवतमाळ जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.





0 टिप्पण्या